fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कबड्डीच्या मैदानात पहिल्यांदाच बघायला मिळाले असे दृश्य !

मुंबई- ना म जोशी मार्ग डीलाईल रोड, मुंबई येथे नुकतीच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो व मुंबई शहर कबड्डी असो मान्यतेने बंड्या मारुती सेवा मंडळाने पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाचा आयोजन करण्यात आलं होतं.

काही कारणास्तव स्पर्धेचं स्थळ बदलूनही ऐनवेळेत दुसऱ्या ठिकाणी स्पर्धाच नियोजन बंड्या मारुती सेवा मंडळाने केले. मातीची दोन मैदाने, प्रेक्षकांना बसायला सुसज्ज अशी गॅलरी व भव्य व्यासपीठ बनवून उत्कृष्ट नियोजनाचा नमुना बघायला मिळाला.

मुंबई येथे पार पडलेला ११ ते १४ एप्रिल दरम्यान यास्पर्धेत एकवेगळाचं दृश्य बघायला मिळाला. कबड्डीच्या मैदानावर सर्व खेळाडूंसाठी मध्यंतरा मध्ये शितपेय देण्यात आलं. बंड्या मारुती सेवा मंडळाला स्पर्धेत शितपेय कंपन्यानी प्रायोजकत्व केलं होतं. त्याच्याकडून संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंसाठी शीतपेय देण्यात आलं.

Photo Courtesy: Dinesh Ghadioankar

उन्हाळ्याच्या हंगामात पार पडलेल्या यास्पर्धेत खेळाडूंना शितपेय देण्याची कबड्डीत बहुदा ही पहिलीच वेळ असावी. कबड्डीच्या मैदाना वरील असा दृश्य खरंच खूप सुंदर होतं. स्थानिक व राज्यस्तरीय पातळीवर कबड्डी खेळला मोठ्या मोठ्या कंपन्या प्रायोजकत्व द्यायला लागल्या ही खूप चांगली गोष्ट आहे.

Photo Courtesy: Dinesh Ghadioankar

यास्पर्धेत शिवशंकर संघाने विजय क्लब संघाचा अंतिम सामन्यात पराभव करून विजेतेपद पटाकवले. शिवशंकर संघाच्या गणेश जाधवला मालिकवीर म्हणून एअर कंडिशनेर देऊन सन्मानित केले. मालिकवीर पुरस्कार म्हणून एयर कंडिशनेर देण्याची ही पहिलीच वेळ होती.

Photo Courtesy: Dinesh Ghadioankar
You might also like