---Advertisement---

Duleep Trophy: दुलीप ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर…! ‘या’ मैदानावर रंगणार सर्व सामने!

On: मंगळवार, जुलै 29, 2025 9:41 PM
---Advertisement---

Duleep trophy 2025 Schedule: दुलीप ट्रॉफी 2025 साठी वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. ही टूर्नामेंट या वर्षी पुन्हा इंटर-झोनल फॉरमॅटमध्ये खेळला जाईल. 2025 मध्ये या स्पर्धेत एकूण 6 झोनचे संघ सहभागी होतील. ही टूर्नामेंट 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल. या हंगामातील सर्व सामने बंगळूरुच्या सेंटर ऑफ एक्सेलन्स ग्राउंडवर खेळवले जातील. ही टूर्नामेंट या वेळी नॉकआउट फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाईल. (Duleep Trophy Format)

तुम्हाला माहिती असेल की, दुलीप ट्रॉफी 2025 साठी साउथ आणि वेस्ट झोनच्या संघांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. दोन उपांत्यपूर्व सामने नाॅर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन विरुद्ध नाॅर्थ-ईस्ट झोन यांच्यात 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान खेळवले जातील. यानंतर उपांत्य फेरीचे सामने 4 ते 7 सप्टेंबर रोजी होतील. त्यानंतर 11 सप्टेंबरपासून अंतिम सामना खेळला जाईल. (Duleep Trophy 2025 Schedule)

दुलीप ट्रॉफी 2025 पूर्ण वेळापत्रक जाहीर!

उपांत्यपूर्व फेरी 1: नाॅर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन – 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट
उपांत्यपूर्व फेरी 2: सेंट्रल झोन विरुद्ध नाॅर्थ-ईस्ट झोन – 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट
उपांत्य फेरी 1: 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर
उपांत्य फेरी 2: 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर
अंतिम सामना: 11 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर

दुलीप ट्रॉफी टूर्नामेंट 2016-17 ते 2019-20 पर्यंत राष्ट्रीय निवडकर्त्यांनी निवडलेल्या संघांमध्ये भारत ए, बी, सी आणि डी खेळला गेला होता. 2022-23 मध्ये ही टूर्नामेंट झोनल फॉरमॅटवर आधारित खेळली गेली, परंतु गेल्या वर्षी पुन्हा ए-बी-सी-डी फॉरमॅटमध्ये बदलण्यात आला. पण, 2024 मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बीसीसीआयच्या निर्णयानंतर टूर्नामेंट पुन्हा झोनल फॉरमॅटमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

इराणी ट्रॉफीबाबतही एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी इराणी कप नागपूरमध्ये खेळला जाईल. विदर्भ रणजी ट्रॉफीचा गतविजेता असल्याने इराणी ट्रॉफीमध्ये त्यांची लढत रेस्ट ऑफ इंडियाशी होईल. मात्र, या सामन्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---