---Advertisement---

काय सांगता! विराट कोहलीविरुद्ध सीनियर खेळाडूने केली होती बीसीसीआयकडे तक्रार, पण का?

On: सोमवार, सप्टेंबर 27, 2021 9:45 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मागच्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती की, आगामी टी-२० विश्वचषकानंतर तो भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. अशातच आता त्याच्याविषयी आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे, भारतीय संघातील एका दिग्गज क्रिकेटपटूने इंग्लंड दौऱ्यावर असताना विराटविषयी बीसीसीआयकडे त्याच्या वागणुकीविषयी तक्रार केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी भारतीय संघात विराटच्या विरोधात वातावर तयार होऊ लागले होते. अशी माहिती मिळाली आहे की, भारतीय संघातील अनेक खेळाडू विराटच्या ड्रेसिंग रूममधील वागणुकीमुळे नाराज आहेत. माहितीप्रमाणे यातील एका वरिष्ठ खेळाडूने विराटच्या विरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली होती. हा खेळाडू विराटवर नाराज होता आणि त्यामुळेच त्याने ही तक्रार केली होती. विराटने या खेळाडूकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले होते.

कोहलीविषयी बीसीसीआयच्या सूत्राने दिली होती महत्वाची माहिती
काही काळापूर्वी बीसीसीआच्या एका सूत्राने सांगितले होते की, “कोहली नियंत्रण गमावत आहे. त्याने सन्मान गमावला आहे आणि काही खेळाडूंना त्याची वागणूक आवडत नाही. तो आता एक प्रेरणादायी कर्णधार राहिला नाही आणि खेळाडूंकडून सन्मान मिळवण्यात अपयशी ठरत आहे. जेव्हा त्यांना तोंड देण्याची वेळ येते, तेव्हा तो त्याच्या मर्यादा ओलांडतो.”

सूत्रांनी पुढे सांगितले होते की, “कोहली मोठा डाव खेळण्यामध्ये अपयशी ठरला आहे. यामध्येही गोष्टी गुंतागुतीच्या झाल्या आहेत. नुकतेच प्रशिक्षकांपैकी एकाने नेट्सविषयी त्याला काही सल्ले दिले, पण कर्णधाराने प्रत्युत्तर देत म्हटेल की, मला गोंधळात टाकू नका. तो याला सांभाळण्यामध्ये अपयशी ठरला आहे आणि हे त्याच्या आक्रमक व्यवहारात दिसत आहे.”

“विराटला वाटते की, तो आता पहिल्यासारख्या फॉर्ममध्ये नाही, ज्यामुळे त्याची पकड थोडी कमी झाली आहे. आता त्याच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न उपस्थित केला जाईल. यात कसलीच शंका नाही की, तो विश्वक्रिकेटमधील सर्वश्रेष्ट फलंकदाजांपैकी एक आहे, पण तुम्ही कर्णधारपदाला तुमच्या फलंदाजीवरचे ओझे बनवू शकत नाही,” असेही सूत्राने पुढे बोलताना म्हटले होते.

विराटसोबत चर्चा करण्यामध्ये खेळाडूंना अडचण
विराटविषयी ही माहिती समोर येण्याआधी एका माजी भारतीय खेळाडूने पीटीआयसोबत बोलताना म्हटले होते की, “विराटसोबत चर्चेची समस्या आहे. महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत, त्याची खोली २४ तास उघडी असायची आणि खेळाडू आतमध्ये जाऊ शकत होता. व्हिडिओ गेम खेळू शकत होता, जेवण करू शकत होता आणि गरज असेल तर क्रिकेटविषयी चर्चा करू शकत होता.”

त्यांनी सांगितले होते, “मैदानाबाहेर कोहलीसोबत संपर्क साधणे खूप अवघड आहे. रोहितमध्ये धोनीची झलक आहे, पण वेगळ्याप्रकारे. तो ज्युनिअर खेळाडूंना जेवणासाठी घेऊन जातो. जेव्हा ते निराश असतात, तेव्हा त्यांची पाठ थोपटतो आणि त्याला खेळाडूंच्या मानसिकेतविषयी माहिती आहे.”

विराट खराब फॉर्ममधील खेळाडूंची साथ देत नाही
एका माजी खेळाडूने पीटीआयशी बोलताना माहिती दिली की, “जोपर्यंत ज्युनिअर खेळाडूंचा प्रश्न आहे, तर कोहलीच्या विरोधात सर्वात मोठी तक्रार अशी आहे की, तो अडचणीच्या काळात त्यांना अर्ध्यात सोडून देतो. ऑस्ट्रेलियामध्ये पाच विकेट्स घेतल्यानंतर कुलदीप यादव नियोजनातून बाहेर झाला. रिषभ पंत जेव्हा फॉर्ममध्ये नव्हता, तेव्हा त्याच्यासोबतही असेच झाले होते. भारतीय खेळपट्टीवर ठोस प्रदर्शन करणारा दिग्गज गोलंदाज उमेश यादवलाही याचे उत्तर नाही मिळाले की, कोणी दुखापतग्रस्त होण्याआधी त्याच्या नावावर विचार का केला जात नाही?”

विराटने नोव्हेंबर २०१९ नंतर एकही शतक केलेले नाही. त्याच्या खेळावर कर्णधारपदाच्या दबावाचा परिणाम होत आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याला अशाच प्रकारच्या परिस्थिला सामोरे जावे लागू शकते. तसेच तो या प्रकारामध्येही कर्णधारपद सोडू शकतो. याबाबत बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “विराटला माहित आहे की, जर संघाने यूएईत टी-२० विश्वचषकात चांगले प्रदर्शन केले नाही, तर त्याला मर्यादित षटकांच्या कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते.”

महत्त्वाच्या बातम्या-
-‘या’ खेळाडूची लागली ‘लॉटरी’, टी-२० विश्वचषकात घेणार हार्दिक पंड्याची जागा?
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---