आॅस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये झालेल्या स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांचे निलबंन तसेच चेंडू छेडछाड प्रकरणानंतर रायवल नाईन नेटवर्क व टेन नेटवर्कने आॅस्ट्रेलीयन क्रिकेट बोर्डाशी असलेला चार दशके जुना करार मोडला होता.
नवीन करारानुसार, देशांतर्गत कसोटी सामन्यांच्या प्रक्षेपणाचा हक्क फाॅक्सटेल व फ्री टू एअर सेवन नेटवर्क यांच्याकडे असणार आहे तर एकदिवसीय व टी20 आंतराष्ट्रीय सामन्यांच्या प्रक्षेपणाचा हक्क फाॅक्स टिव्हीकडे असणार आहेत.
दोन्ही कंपन्या महिलाचे सर्व आंतराष्ट्रीय सामने व बिग बॅश लीगच्या 16 सामन्यांचे प्रेक्षपण करणार आहे. तसेच फाॅक्सटेल व फ्री टू एअर सेवन नेटवर्क या दोन्ही कंपन्या एकाच वेळेस पुरुषांच्या बिग बॅश लीगच्या 43 सामन्यांचे व 16 खेळांचे प्रक्षेपण करणार आहे.
फाॅक्स टिव्ही व आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये डिजीटल करार देखील झाला आहे.