ऑस्ट्रेलियाचा दिवंगत महान क्रिकेटपटू शेन वॉर्न याचा ऑस्ट्रेलियाने एका वेगळ्याच प्रकारे सन्मान केला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने सोमवारी (26 डिसेंबर) मोठा निर्णय घेतला. त्यांनी ऑस्ट्रेलिया पुरूष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर या त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रतिष्ठित पुरस्काराला शेन वॉर्नचे नाव दिले आहे. हा निर्णय बोर्डने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या आधी म्हणजेच बॉक्सिंग डेला घेतला. या निर्णयाचे ट्वीट ऑस्ट्रेलिया क्रिकेटने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार एलन बॉर्डर मेडल आहे. त्यानंतर पुरूष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर याचा क्रमांक लागले. शेन वॉर्न (Shane Warne) याने कसोटी प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार 2006मध्ये कारकिर्दीत एकदाच जिंकला होता. त्याने 2005च्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 40 विकेट्स घेतल्या होत्या. ऍशेसमध्ये केलेल्या या उत्तम कामगिरीमुळे त्याच्यासाठी ते वर्ष सर्वोत्तम ठरले होते.
हा पुरस्कार जिंकणारा ट्रेविस हेड शेवटचा विजेता आहे. पुढील वर्षासाठी उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्यूशेन आणि नॅथन लायन हे त्याचे प्रमुख दावेदार आहेत. हा पुरस्कार सर्वाधिक वेळा मायकल क्लार्कने जिंकला. त्याने 2009, 2012, 2013 आणि 2014 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता.
The Shane Warne Test Player Of The Year sounds pretty good to us ❤️ pic.twitter.com/S5Iasx6Hyw
— Cricket Australia (@CricketAus) December 26, 2022
लॅब्युशेन या पुरस्कारासाठी आतापर्यंत घेतलेल्या मतांमध्ये आघाडीवर आहे. त्याने या हंगामात 8 कसोटीमध्ये 69.75च्या सरसरीने 837 धावा केल्या आहेत. त्यानंतर ख्वाजाचा क्रमांक लागतो. त्याने 68.66च्या सरासरीने 824 धावा केल्या आहेत. लायनने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक अशा 39 विकेट्स घेतल्या आहेत. या पुरस्काराची घोषणा 30 जानेवारीला करण्यात येणार आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना यजमानांनी 6 विकेट्सने जिंकला आहे. दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात असून पहिल्यांदाच वॉर्न स्टॅंडवर कसोटी सामना खेळण्यात येत आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे निश्चित असून पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणार आहे. The Shane Warne Test Player Of The Year AUSvSA Test Series
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेच्या चाहत्याने अश्विनशी पंगा घेऊन केली मोठी चूक, फिरकी मास्टरने दिले जशास तसे उत्तर
टॉप सहामधील स्थान आणखी मजबूत करण्यासाठी केरळा ब्लास्टर्स आणि ओडिशा एफसी भिडणार






