मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहिर पाकिस्तानमध्ये चार महिने राहिल्यानंतर अखेर वेस्ट इंडिजला रवाना झाला. इम्रान ताहिर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) खेळण्यासाठी पाकिस्तानात होता. मार्चपासून तो कोविड 19 च्या साथीमुळे विमानसेवा बंद असल्याने तो पाकिस्तानमध्येच राहिला होता. पाकिस्तानमध्ये जन्मलेला दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज रविवारी वेस्ट इंडिजला रवाना झाला. तेथे तो कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये भाग घेणार आहे.
पीसीएलमधील प्लेऑफ सामने खेळले गेले नाहीत. कोविड 19 साथीच्या आजारामुळे पीएसएलचे उर्वरित सामने 15 मार्च नंतर पुढे ढकलण्यात आले. ताहिर मुल्तान सुल्तानसंघाकडून खेळतो. कोरोनामुळे विमान सेवेवर बंदी झाल्याने ताहिरला लाहोरमध्येच राहावे लागले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “तो लाहोरचा रहिवासी आहे आणि विमानसेवा सुरू होईपर्यंत तो येथेच राहिला.”
सीपीएल 28 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. या स्पर्धेत पाच संघ खेळणार असून 28 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत एकूण 23 सामने खेळले जातील. यानंतर इम्रान ताहिर युएईला रवाना होऊ शकेल. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे. इम्रान ताहिर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) कडून खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘दादा’च्या ‘त्या’ एका फोनवर मिळाली गरीब कुटुंबाला मदत; झाली कोरोना चाचणी
-आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, ४ वर्षांनी दिग्गज खेळाडू करतोय कमबॅक
-ICC वर्ल्ड कप सुपरलीग: फ्रंटफूट नोबॉलवर असणार थर्ड अंपायरची करडी नजर, पहा आयसीसीचे नवे नियम
ट्रेंडिंग लेख-
-सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे ३ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
-आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…
-पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती