कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) बेंगळुरूमधील प्रतिष्ठित एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या (M.Chinnaswamy Stadium) स्टँडला कर्नाटकच्या दिग्गज क्रिकेटपटूंचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. जो क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. या निर्णयाचे भारतीय फलंदाज केएल राहुलसह (KL Rahul) भारतीय क्रिकेट जगतातून कौतुक होत आहे. राहुलने या उपक्रमाचे स्वागत केले आणि गंमतीने सांगितले की, एक दिवस त्याचे नावही या यादीत समाविष्ट केले जाऊ शकते.
ॲडलेड ओव्हल येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान केएल राहुलला (KL Rahul) विचारण्यात आले की, तुम्हाला त्यांच्या नावाचे स्टँडही पाहायला आवडेल का? यावर राहुल म्हणाला, “प्रत्येक खेळाडूला हेच हवे असते, पण ज्या खेळाडूंच्या नावावर स्टँडचे नाव आहे, तितक्याच धावा मला करायच्या आहेत. जर मी हे करू शकलो तर कदाचित एक दिवस माझेही नाव या यादीत येईल. पण मी अजून त्या पातळीवर पोहोचलो नाही.”
केएल राहुलने (KL Rahul) या निर्णयाचे कर्नाटक आणि भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे वर्णन केले. पुढे बोलताना राहुल म्हणाला, “त्या खेळाडूंच्या योगदानाचा गौरव करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा एखाद्या खेळाडूच्या नावाचे स्टँडला नाव दिले जाते, तेव्हा ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. हा खरोखरच एक अद्भुत उपक्रम आहे.”
हे महत्त्वाचे पाऊल उचलत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने स्टेडियमच्या स्टँडला कर्नाटक क्रिकेटच्या दिग्गजांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दिग्गज खेळाडूंच्या नावावर हे स्टँड असतील, त्यात बी.एस. चंद्रशेखर, ई.ए.एस. प्रसन्ना, जी.आर. विश्वनाथ, सय्यद किरमाणी, रॉजर बिन्नी, ब्रिजेश पटेल, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, राहुल द्रविड आणि व्यंकटेश प्रसाद यांच्या नावांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“क्रिकेटला उच्च स्तरावर नेण्याची क्षमता जय शाह…” माजी आयसीसी अध्यक्ष्यांचे मोठे वक्तव्य
दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “जसप्रीत बुमराह, विराट कोहली…”
IND vs PAK; काही तासातच रंगणार फायनलचा थरार! कधी आणि कुठे पाहायचा सामना