Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“रिमेंबर द नेम, कार्लोस ब्राथवेट” या ऐतिहासिक शब्दांचे जनक इयान बिशप्स

The Story of Former West Indies Cricketer Ian Bishops

October 24, 2022
in टॉप बातम्या, क्रिकेट
Photo Courtesy: Twitter/windiescricket

Photo Courtesy: Twitter/windiescricket


भारतात २०१६ साली आयोजित केलेल्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर चांगलाच रंगला होता. वेस्ट इंडीजला विजयासाठी अखेरच्या षटकात १९ धावांची गरज होती. खेळपट्टीवर जम बसलेला मार्लन सॅम्युअल्स व नवोदित कार्लोस ब्राथवेट उभे होते. इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने निर्णायक षटक टाकण्यासाठी चेंडू बेन स्टोक्सच्या हाती सोपवला. तोपर्यंत पारडे इंग्लंडच्या बाजूने होते. ब्राथवेटने पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार मारत, सामना वेस्ट इंडिजच्या बाजूला झुकवला. सर्व क्रिकेटप्रेमींच्या हृदयाची धडधड वाढली होती. स्टोक्सने टाकलेला तिसरा चेंडूदेखील प्रेक्षकांत भिरकावत ब्राथवेटने सामन्यात औपचारिकता बाकी ठेवली. बेन स्टोक्सने रडत-रडत चौथा चेंडू टाकला आणि ब्राथवेटने तो देखील हवेत मारला. ईडन गार्डन्सच्या लहान मैदानात हा चेंडू षटकारच जाणार, हे माहित असताना, समोलचकाचा आवाज आला,

“कार्लोस ब्राथवेट रिमेंबर द नेम”

अत्यंत उस्फूर्तपणे आलेला हा आवाज, आजही क्रिकेटप्रेमींच्या कानात घुमतो आहे. ब्राथवेटने चार षटकार मारत, वेस्ट इंडीजला जिंकून दिलेल्या विश्वचषकाचा ऐतिहासिक क्षण शब्दबद्ध करणारे समालोचक होते वेस्ट इंडिजचे दिग्गज वेगवान गोलंदाज. कॉलिन क्रॉफ्ट, मायकल होल्डिंग, जोएल गार्नर, अँडी रॉबर्ट्स यांच्यानंतरच्या काळात वेस्ट इंडीजला जे सर्वोत्तम वेगवान गोलंदाज लाभले त्यापैकी एक असलेले इयान बिशप्स.

चेंडू वळाले नाहीत आणि बिशप्स बनले वेगवान गोलंदाज

आपल्या तुफानी गोलंदाजीने भल्याभल्यांच्या उरात धडकी भरवणारे बिशप्स खरेतर वेगवान गोलंदाज होणारच नव्हते. फलंदाजी शिकण्यासाठी क्रिकेट क्लबमध्ये सामील झालेले बिशप्स हळूहळू फिरकी गोलंदाजी टाकायला लागले. वेस्ट इंडीजमध्ये दर्जेदार फिरकीपटू कमी असल्याने, त्यांना फिरकी गोलंदाज व्हायचे होते. त्यांना असं वाटायचे की, फिरकीपटू झालो तर आपल्याला लवकर संधी मिळेल. सुरुवातीला त्यांना अशी हळूवार गोलंदाजी करायला गंमत वाटे. पण, त्यांच्या चेंडूंना तितकेसे वळणच मिळत नव्हते. बरीच मेहनत घेऊनही, चांगली फिरकी गोलंदाजी करायला न जमल्याने, त्यांनी अखेरीस वेगवान गोलंदाज होण्याचा निर्णय घेतला.

दिग्गज गोलंदाजांचे करत अनुकरण

सत्तरच्या दशकात ज्या वेगवान गोलंदाजांनी क्रिकेट जगतावर राज्य केले, त्या वेस्ट इंडिजच्या महान गोलंदाजांना पाहण्यासाठी बिशप्स आणि त्यांचे लहान भाऊ पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर जात. लहानपणाची, या दिग्गजांविषयीची आठवण सांगताना बिशप्स म्हणतात,

“आम्ही मार्शल यांच्यासारखी गोलंदाजी, होल्डिंग यांच्यासारखी अचूकता आणि कॉलिन क्रॉफ्ट यांच्यासारखा फॉलोथ्रू राखायचा प्रयत्न करायचो. फक्त आम्हीच नाही, तर जे जे लोक या महान गोलंदाजांची गोलंदाजी पहायचे, ते सर्व लोक त्यांचे अनुकरण करत असायचे.”

श्रीकांत यांना केले होते जायबंदी

सलग तीन विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या, वेस्ट इंडिजला १९८७ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्यास अपयश आले होते. वेस्ट इंडीज क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने, अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात येत होती. यातच बिशप्स यांनादेखील जागा मिळाली. त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच वेस्ट इंडीजच्या तेवीस वर्षाखालील संघासाठी दमदार कामगिरी करत ते राष्ट्रीय संघात दाखल झाले. कसोटी पदार्पण करण्याआधीच, बिशप्स यांनी जागतिक क्रिकेटला आपली दखल घेण्यास भाग पाडले. सन १९८८ च्या वेस्ट इंडीज दौ-यावर गेलेल्या भारतीय संघाविरुद्ध त्यांनी तुफानी गोलंदाजी केली होती. भारताचे सलामीवीर के. श्रीकांत यांच्या डोक्यावर बिशप यांच्या चेंडूने जोरदार प्रहार केला होता. यामुळे, श्रीकांत यांना रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले होते.

कारकीर्दीच्या सुरुवातीलाच केली विक्रमी कामगिरी

कसोटी पदार्पण केल्यानंतर, बिशप्स यांनी आपल्या गोलंदाजीने क्रिकेट जगत गाजवायला सुरुवात केली. आपल्या पहिल्या ११ कसोटी सामन्यांत ५० तर २१ सामन्यांत १०० बळी मिळवत त्यांनी विक्रमी कामगिरी केली. योगायोग म्हणजे, बिशप्स ज्यांना आदर्श मानत त्या जोएल गार्नर व कॉलिन क्रॉफ्ट यांनीदेखील २१ कसोटी सामन्यांतच, बळींचे शतक पूर्ण केले होते.

दुखापतींनी केले बेजार

बिशप्स यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द रुळावर आली असतानाच, पाठीच्या दुखण्याने डोके वर काढले. वयाच्या तेविसाव्या वर्षी, सन १९९१ मध्ये त्यांच्या मणक्याला गंभीर इजा झाली. या दुखापतीमुळे त्यांना सलग आठ मालिकांतून माघार घ्यावी लागली. योग्य उपचार व गोलंदाजी शैलीत बदल केल्यानंतर, १९९२ मध्ये त्यांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. सन १९९३ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पर्थ कसोटी दरम्यान त्यांनी ४० धावा देऊन ६ बळी मिळवत, आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ त्यांचा इंग्लंड दौरा देखील यशस्वी ठरला. याच वेळी पुन्हा त्यांच्या दुखण्याने उचल खाल्ली. या वेळी शस्त्रक्रिया केल्याने, त्यांचा वेग मंदावला.

एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी

भारतीय उपखंडात १९९६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या, विश्वचषकासाठीच्या वेस्ट इंडिज संघात त्यांचा समावेश केला गेला होता. त्यांनी स्पर्धेत नियंत्रित गोलंदाजी करताना ६ बळी मिळवले. १९९२-१९९३ बेन्सन अॅण्ड हेजेस वर्ल्ड सिरीजमध्ये पाकिस्तान विरुद्ध २५ धावात घेतलेले ५ बळी त्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.

वयाच्या ३१ व्या वर्षी घ्यावी लागली निवृत्ती

सततच्या दुखापतींना कंटाळून बिशप्स यांनी वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. कर्टनी वॉल्श आणि कर्टली अंब्रोज यांच्यासोबतीने दहा वर्षे वेस्ट इंडीजच्या वेगवान आक्रमणाची धुरा वाहताना, बिशप्स यांनी अप्रतिम कामगिरी केली. आपल्या कारकीर्दीत ४३ कसोटी व ८४ एकदिवसीय सामने खेळताना त्यांनी अनुक्रमे १६१ आणि ११८ बळी मिळवले. एका अत्यंत गुणवान गोलंदाजाने खुप लवकर निवृत्ती घेतल्याने, वेस्ट इंडीज क्रिकेटचे नुकसान नक्कीच झाले.

समालोचन क्षेत्रात बनवली ओळख

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, बिशप्स यांनी समालोचनाच्या माध्यमातून आपली ‘सेकंड इनिंग’ सुरू करण्याचे ठरवले. त्यांनी, समालोचन क्षेत्रात पदार्पण करण्याआधी लिस्टर कॉलेजमधून एमबीएची पदवी संपादन केली. समालोचकाची भूमिका निभावण्यास सुरुवात केल्यापासून, त्यांना पहिल्यासारखीच प्रसिद्धी मिळत राहिली. त्यांच्या सौम्य आणि मृदू आवाजात समालोचन ऐकणे, क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. गेली दोन दशके ते आयसीसीच्या स्पर्धा व व्यावसायिक लीगमध्ये समालोचनाच्या माध्यमातून क्रिकेटचाहत्यांना आनंद देत आहेत.

ज्याप्रकारे रवी शास्त्री यांच्या ” Dhoni Finishes Off In Style”(धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल)  या २०११ विश्वचषक विजयानंतरच्या शब्दांचा चाहतावर्ग आहे, त्याचप्रमाणे बिशप्स त्यांच्या “Carlos Brathwaite! Remember The Name” (कार्लोस ब्रेथवेट! रिमेंबर द नेम) या शब्दांची क्रेझदेखील तितकीच आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा-
ग्रॅहम गूचचा ‘स्वीप अटॅक’ अन् भारताची विश्वचषकातून ‘एक्झिट’
क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे प्रेमाच्या पिचवरही ‘लांबा’ आघाडीवरच राहिले! वाचा बेधडक ‘रॅम्बो’ची जीवनकहाणी
अवघ्या तीन वर्षात क्रिकेटविश्वात आपला धाक जमवणारे ‘ऍलन डोनाल्ड’


Next Post
Photo Courtesy: Twitter/@ICC

टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारे दोन गोलंदाज, दुसरे नाव आहे चकीत करणारे

Photo Courtesy: Twitter/@BCCI

वाढदिवस विशेष- क्रिकेटर वृद्धिमान साहा

Rahul Dravid Celebration

शांत द्रविडचे भन्नाट सेलेब्रेशन! आयसीसीने शेयर केलायं व्हिडिओ, एकदा पाहाच

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143