Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता भारतीय महिलाही “पावरफुल”

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात 19 महिलांची ताकद

July 13, 2022
in अन्य खेळ, टॉप बातम्या

मुंबई, दि. 13 (क्रीडा प्रतिनिधी)- शरीरसौष्ठव खेळ हा पुरूषप्रधान आहे, ही समजूत खोडून काढण्यासाठी भारतीय महिला खेळाडू सज्ज झाल्dया आहेत. येत्या  15 ते 21 जुलैदरम्यान मालदीवमध्ये रंगणाऱ्या 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या 81 खेळाडूंच्या संघात पाच-दहा नव्हे तर 19 महिला खेळाडू आपली पीळदार आणि आकर्षक शरीरयष्टी दाखविणार आहेत. एवढेच नव्हे तर काही खेळाडूंकडून सोनेरी इतिहास रचला जाण्याची शक्यता वर्तविली जातेय. विशेष म्हणजे शरीरसौष्ठवाच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने महिला खेळाडू सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चूल-मुल सांभाळणाऱ्या महिला “पावरफुल” झाल्या आहेत, हे आता अवघ्या जगाला पाहायला मिळणार असल्याचा विश्वास भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी बोलून दाखविला.
 ज्याप्रमाणे शरीरसौष्ठव हा खेळ पुरूषप्रधान आहे, तसाच भारत हा देश आजही पुरूषप्रधान संस्कृतीतच गुरफटून पडलाय. मात्र ही संस्कृती मोडीत काढण्यासाठी यावेळी महिला शरीरसौष्ठवपटूंनीच कंबर कसलीय. गेली तीन वर्षे शरीरसौष्ठवाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सोनं जिंकणारी हरयाणाची गीता सैनी यावेळी पदकाची प्रबळ दावेदार आहे. ती म्हणते, मालदीवमध्ये “जन गण मन” चे सूर माझ्या कामगिरीच्या जोरावर निनादावेत, हेच माझे ध्येय आहे आणि गेले तीन महिने मी याचीच तयारी करतेय. त्याचबरोबर शरीरसौष्ठवाच्या दोन गटात माधवी बिलोचन, करिष्मा चानू आणि डॉली सैनी या भारताच्या महिलांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. महत्वाचे म्हणजे गीता शरीरसौष्ठवाबरोबर ऍथलीट फिजीक प्रकारातही खेळणार आहे.
शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत एकंदर दोन गट असतात, एक म्हणजे 50 किलो आणि दुसरा 50 किलोवरील. तसेच  अन्य चार गट मॉडेल फिजीक, स्पोर्टस् फिजीक, ऍथलेटिक फिजीक आणि मॉडेल फिजीक (30 वर्षांवरील) असतात. या चार गटांमध्ये एकूण 15 खेळाडू आपले कौशल्यपणाला लावतील. या चारही गटात भारताच्या एकापेक्षा एक खेळाडू सहभागी होणार आहे. मात्र सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी सज्ज झालीय ती मुंबईकर डॉक्टर. होमियोपॅथी डॉक्टर असलेल्या मंजिरी भावसारने आपला व्यवसाय सांभाळता सांभाळता फिटनेस क्षेत्रातही महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धा जिंकलेल्dया मंजिरीने चार वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. मात्र यावेळी तिला आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायचीय. भारतासाठी सोनं जिंकून आणायचंय. मंजिरी मॉडेल फिजीक प्रकारामध्ये खेळतेय आणि तिची सध्या कामगिरी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, पण त्याचबरोबर ती एका 15 वर्षीय मुलाची आईसुद्धा आहे. एक डॉक्टर किंवा एक खेळाडूच नव्हे तर एक आईसुद्धा जग जिंकू शकते, हे तिला भारतीय लोकांना दाखवून द्यायचे आहे. म्हणूनच गेली तीन महिने ती या स्पर्धेची तयारी करतेय आणि आता ते खरं करून दाखवण्याची वेळ आल्याचे ती छातीठोकपणे सांगतेय.
भारताच्या संघातील सर्वात स्फूर्तीदायक आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे निशरीन पारीख. या बिकीनी घालून आपल्या पीळदार शरीरयष्टीसह 16 वर्षांच्या खेळाडूंना आव्हान द्यायला आशियाई स्पर्धेत उतरत आहेत. वयाने 55 आकडा ओलांडला तरी त्यांची स्पर्धेत उतरण्याची जिद्द वर्षागणिक वाढतच चालली आहे. त्यांच्यासाठी वय हे केवळ अंक आहे. फिटनेसमुळेच मी माझ्यातल्dया सर्वोत्तम गुणाला जगासमोर आणू शकली आहे. माझ्यासाठी जिंकण्यापेक्षा खेळणं महत्त्वाचं आहे. लढण्याची वृत्ती महत्वाची आहे. त्यामुळे मला जितकी वर्षे शक्य आहे, मी खेळत राहणार. आगामी आशियाई स्पर्धेत निश्चितच खेळता खेळता मला माझी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. भारतासाठी मेडल ज्ंिाकायचं आहे. मेडलचा रंग कोणताही असू देत, खेळणं आणि संघर्ष करणं आपल्याला जगायला शिकवतं, हेच मी सर्वांना सांगू इच्छिते, असे निशरीन पारीख म्हणाल्या.
अभिमानास्पद बाब – हिरल शेठ
इतक्या मोठ्या संख्येने भारतीय संघाकडून महिला खेळाडू आशियाई स्पर्धेत उतरत असल्याची बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. याचाच अर्थ असा की आता शरीरसौष्ठवाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतात आजही पुरूषप्रधान संस्कृती असली तरी आता ती वेगाने बदलतेय आणि आमच्या खेळातही ती बदलतेय. आमच्या खेळाडू केवळ सहभागी व्हायला जात नसून देशासाठी मेडलसुद्धा जिंकून आणतील, याचा मला विश्वास असल्याचे भारतीय शरीरसौष्ठव संघटनेच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी सांगितले.
54 व्या आशियाई स्पर्धेत सहभागी भारतीय महिला खेळाडू
शरीरसौष्ठवपटू : गीता सैनी (हरयाणा), माधवी बिलोचन (झारखंड), करिष्मा चानू (मणिपूर), डॉली सैनी (दिलल)
फिजीक स्पोर्टस् : मंजिरी भावसार, निशा भोयर, अंकिता गेन, भाविका प्रधान, निशरीन पारीख, नेहा प्रभाकर, लिली हश्नू, बरनाली बासुमटारी, साया बरूआ, अदिती बंब, सोलन जाजो, निधी बिश्त, कल्पना छेत्री,  सोलिमिया जाजो, वीणा चौहान.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘बुमराह जगातील नंबर १ गोलंदाज आहे का?’, पत्रकाराच्या प्रश्नावर इंग्लंडच्या कर्णधाराने दिलेले उत्तर चर्चेत

दणकेबाज विजयानंतरही टीम इंडियावर ‘नाराज’ आहेत आनंद महिंद्रा; म्हणाले, ‘टीव्ही सुरू करण्याआधीच…’

लॉर्ड्सवर भारत-इंग्लंडमध्ये कोण ठरलंय वरचढ, जाणून घ्या दोन्ही संघांचा या मैदानावरील विक्रम


Next Post

पहिल्या अल्टिमेट खो खो लीग स्पर्धेला पुण्यात 14 ऑगस्ट रोजी प्रारंभ

भाग्यश्री पाटील, रक्षिता रवी, तनिशा बोरामणीकर यांची विजयी सलामी

Photo Courtesy: Twitter/@ICC and @cricketworldcup

क्रिकेट विश्वचषकातील सर्वात नाट्पूर्ण सामना; इंग्लंड ठरला होता विश्वविजेता, तर पराभूत न होताही न्यूझीलंड मात्र उपविजेता

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143