क्रिकेटमध्ये आयसीसी विश्वचषकानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वात महत्त्वाची मानली जाते. आयसीसीने आतापर्यंत अनेक वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करणाऱ्या संघाची माहिती घेणार आहोत.
सर्वाधिक वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करणारे संघ-
पाकिस्तान, आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज-
या 5 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद एकदा आपल्या नावावर करण्याचा मान मिळाला आहे. यामध्ये १९९८मध्ये दक्षिण आफ्रिकेने (South Africa) सर्वात पहिल्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. यानंतर न्यूझीलंडने २०००मध्ये , श्रीलंकेने २००२मध्ये (भारताबरोबर विभागुन) आणि वेस्ट इंडीजने २००४मध्ये ही ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.
याव्यतिरिक्त २०१८ला इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) झाली होती. यातील अंतिम सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) भारतीय संघाला पराभूत करून पहिल्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
ऑस्ट्रेलिया-
ऑस्ट्रेलिया संघ जगातील सर्वात नामांकित संघापैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाने (Australia) क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विश्वचषक आपल्या नावावर केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मानही ऑस्ट्रेलियाला मिळाला आहे. त्यांनी २००६ आणि २००९मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत विजेतेपद मिळविले होते.
भारत-
सध्याच्या काळात भारतीय संघ (Team India) वनडे क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. तरी भारतीय संघाला २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.
याव्यतिरिक्त आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये भारतीय संघाने नेहमी चांगली कामगिरी केली आहे. यातील चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारताने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. भारतीय संघाने सर्वात पहिल्यांदा २००२ मध्ये सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळविला होता. त्यानंतर २०१३ला इंग्लंडमध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टीम इंडियाविरुद्ध पराभूत झाल्यावर या कारणामुळे पाॅटींग सोडले होते कर्णधारपद
-सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे ५ कर्णधार, धोनी नाही तर हा भारतीय आहे टाॅप५मध्ये
-टाॅप ५- वयाची २३ वर्ष पुर्ण करण्यापुर्वीच कसोटी कर्णधार झालेले खेळाडू