क्रिकेटचे चाहते नेहमीच कोणत्या कोणत्या स्पर्धेची वाट पाहत असतात. तसंच आता एका स्पर्धेमध्येसुद्धा रोमांच पाहायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रीका (SA) लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 1 ऑक्टोबर रोजी होणार असून यामध्ये 13 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. लीग कमिशनर ग्रॅमी स्मिथ यांनी ही माहिती दिली. एसएचा आगामी हंगाम (9 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2025) या कालावधीत खेळवला जाणार आहे.
माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) नुकताच पार्ल रॉयल्स सघात सामील झाला आहे, जो या लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय असणार आहे. याशिवाय प्रत्येक संघाला तिसऱ्या हंगामासाठी नवीन खेळाडूची निवड करावी लागेल तर 3 संघांना 30 डिसेंबरपूर्वी वाईल्ड कार्ड जाहीर करावे लागणार आहे. कार्तिक व्यतिरिक्त, बेन स्टोक्स, केन विल्यमसन, जो रूट, ट्रेंट बोल्ट, जॉनी बेअरस्टो, डेव्हॉन कॉनवे, जॅक क्रोली, रशीद खान आणि रहमानउल्ला गुरबाज यांसारखे स्टार खेळाडू देखील एसए-20 मध्ये सहभागी होणार आहेत.
ग्रीन स्मिथ म्हणाला की, “घरच्या मैदानावरचे स्टार खेळाडू जसे की, एडन मारक्रम, कागिसो रबाडा आणि हेनरिक क्लासेन यांच्यासह आंतरराष्ट्रीय दिग्गजांचे आगमन हा एक चांगला हंगाम असेल. सर्व संघांनी कायम ठेवलेल्या सर्व देशांतर्गत क्रिकेटपटूंचा आम्हाला अभिमान आहे.”
एसए-20 चा तिसरा हंगाम सुरु होणार आहे. तत्पूर्वी एसएस20च्या विजेत्या संघाबद्दल बोलायचं झालं तर त्याचे दोन्हीही हंगाम सनरायझर्स इस्टर्न केपने जिंकले आहेत. दोन्ही हंगमात त्यानी चमकार कामगिरीचे प्रदर्शन दाखवले. यंदाच्या एसए-20 मध्ये एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. हा हंगामदेखील चाहत्यांसाठी खूप रोमांचक असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अप्रतिम, तेजस्वी आणि जबरदस्त…, बुची बाबू स्पर्धेच्या सामन्यात ईशान किशनचे शानदार शतक, यष्टीमागे देखील कमाल
बांग्लादेशकडून महिला टी20 विश्वचषकाचे यजमानपद हिसकावले जाणार, या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता
“भारत भाग्यवान आहे…” माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने केंद्रीय करार नाकारलेल्या खेळाडूंबद्दल दिली परखडं प्रतिक्रिया