भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना सेंच्युरियन मैदानावर रंगला आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेपुढे 6 गड्यांच्या मोबदल्यात 220 धावांचे आव्हान ठेवले आहे.
दक्षिण आफ्रिकन कर्णधार एडन मारक्रमने (Aiden Markram) टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाने आफ्रिकेपुढे 220 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडू सलामीला आलेल्या संजू सॅमसनला (Sanju Samson) शून्यावर बाद केले, तर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) शानदार अर्धशतकी (50 धावा) खेळी केली. त्यानंतर डावखुरा फलंदाज तिलक वर्माने (Tilak Verma) नाबाद शतकी खेळी केली. दरम्यान त्याने 56 चेंडूत झंझावाती 107 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत 8 चौकारांसह 7 षटकारांचा समावेश होता.
हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 18 धावांची खेळी केली, तर रिंकू सिंहने (Rinku Singh) मात्र 8 धावा केल्या. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रमणदीप सिंगने (Ramadeep Singh) 6 चेंडूत 15 धावा केल्या. दरम्यान त्याने 1 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार ठोकला.
दक्षिण आफ्रिकेसाठी 3 गोलंदाज विकेट्स घेण्यात यशस्वी ठरले. त्यामध्ये अँडीले सिमलानेने 2 तर फिरकीपटू केशव महाराजने 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या आणि वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने 1 विकेट घेतली.
तिसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारत- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिका- रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मारक्रम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुथो सिपामला
IND vs SA; ‘आधी हीरो नंतर झीरो’ बाद झाल्यानंतर संजूच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा रेकाॅर्ड
“या 4 खेळाडूंमुळे माझ्या मुलाचे 10 वर्ष क्रिकेट करिअर उध्वस्त…” संजूच्या वडिलांचे खळबळजनक वक्तव्य
IND vs SA; 27 वर्षीय भारतीय खेळाडूने केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण…!