सध्या सुरू असेलेल्या ऑस्ट्रेलिया (australia) आणि इंग्लंड (england) यांच्यातील महिला ऍशेस (womens ashes) मालिकेतील तिसरा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. टी२० मालिकेतील तिसरा सामना रविवारी (२३ जानेवारी) ऍडिलेडमध्ये खेळला जाणार होता. पण, पावसाने बाधा निर्माण केल्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. तत्पूर्वी, दुसरा टी२० सामना देखील पावसामुळे रद्द झाला होता. अशात उभय संघाची पावसामुळे चांगलीच निराशा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
उभय संघातली हा तिसरा आणि शेवटचा टी२० सामना होता. पण एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द केला गेला. महिला ऍशेस मालिकेत आतापर्यंत फक्त एक सामना पूर्ण खेळला गेला. मालिकेतील पहिला टी२० सामना ऍडिलेडमध्येच पार पडला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने ९ विकेट्सने विजय मिळवला. तर मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात देखील पावसाने आडकाठी आणली आणि तो रद्द करावा लागला होता.
पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. इंग्लंड महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ४ विकेट्सच्या नुकसानावर १६९ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया महिला संघाने १७ व्या षटकात विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फक्त एक विकेट गमावली आणि मालिकेची सुरुवात विजयाने केली.
त्यानंतर उभय संघातील दुसरा सामना २२ जानेवारीला खेळला गेला. यामध्ये पावसामुळे नाणेफेक उशिरा झाली आणि षटकांची संख्या कमी करून १४ षटके करण्यात आली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने एकही विकेट न गमावता ४.१ षटकात २५ धावा केल्या होता. पण तेवढ्यात पाऊस पुन्हा सुरू झाला आणि खेळाडूंंना मैदान मोकळे करावे लागले.
उभय संघातील टी-२० मालिका आता संपली असून, गुरुवारी (२७ जानेवारी) एकमात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिय आणि इंग्लंड यांच्यात ३ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या पुरुष संघात पाच कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका पार पडली. पुरुषांच्या ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलियाने ४-० ने दणदणीत विजय मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या –
रडू की हसू…! एकाच चेंडूवर २ वेळा गेली विकेट, विचित्र पद्धतीने रनआऊट झाला आंद्रे रसेल
विजयी शेवट करण्यासाठी माजी क्रिकेटरचा टीम इंडियाला ‘मंत्र’, असे करण्यात यशस्वी होतील का गोलंदाज?
व्हिडिओ पाहा –