Asia Cup 2025 : आशिया कप 2025 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात त्रिकोणी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतून यूएईचा प्रवास संपला असून अंतिम फेरीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी आपले स्थान पक्के केले आहे. 7 सप्टेंबर रोजी या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. भारतात हा सामना फॅन कोड ॲपवर पाहता येणार आहे.(In India, this match will be available to watch on the Fan Code app)
दोन्ही संघ आशिया कप 2025 मध्येही सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तानला हलक्यात घेता येणार नाही, कारण या संघाने टी-20 मध्ये अप्रतिम खेळ सादर केला आहे. आशिया कपबाबत बोलायचे झाल्यास यूएई हा स्पर्धेचा यजमान असेल. स्पर्धेचा पहिला सामना 9 सप्टेंबरला खेळवला जाईल, तर अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना 14 सप्टेंबरला रंगणार आहे.
(The thrilling match between India and Pakistan will be played on September 14)






