---Advertisement---

उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाच्या तयारीसाठी ‘हे’ दोन संघ युएईत लवकर पोहचण्यास सज्ज

On: गुरूवार, जुलै 22, 2021 10:51 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अजूनही जाहीर केले नाही. परंतु काही फ्रँचायझींनी अगोदरच युएईमधील त्यांच्या कामकाजांच्या योजनांबद्दल मंडळाला माहिती दिली आहे. आयपीएल 2021 हंगाम स्थगित होण्यापूर्वी 29 सामने खेळले होते. आता या हंगामातील उर्वरित 31 सामने युएईमध्ये खेळले जाणार आहेत. हे उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात खेळले जाणार आहेत.

आयपीएलच्या या अगोदर झालेल्या सामन्यांच्या आधारित गुणतालिकेमध्ये अव्वल दोन संघांमध्ये असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाला लवकर युएईला जायचं आहे. त्यांनी बीसीसीआयला 20 ऑगस्टपर्यंत दुबईत जाण्याच्या त्यांच्या योजनेची माहिती देखील दिलेली आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार स्थानिक सरकारच्या सल्ल्यानुसार आणि बीसीसीआयच्या सल्ल्यानुसार क्वारंटाईनचा आवश्यक कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिबिर त्यांना सुरू करायचे आहे. कोरोना महामारी आणि पावसाळा लक्षात घेता दोन्ही संघांनी भारतात शिबिर आयोजित करण्याच्या योजना टाळल्या आहेत.

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन म्हणाले की, “आम्हाला 15 ऑगस्टपर्यंत किंवा 20 पर्यंत जायचे आहे. आम्ही याबाबत बीसीसीआयला देखील कळविले आहे. आम्ही आवश्यक परवानग्या मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहोत.”

दिल्ली कॅपिटलच्या एका अधिकाऱ्याने पुष्टी केली आहे की, त्यांना त्याच काळात दुबईमध्ये रहायचे आहे आणि त्यांनी बीसीसीआय आणि आयपीएलच्या अधिकाऱ्यांना या अगोदरच कळविले आहे.

त्यामुळे हे दोन्ही संघ पुढील महिन्यात यूएईला जाण्याची शक्यता येत आहे. पण त्याअगोदर बीसीसीआयची परवानगी मिळणे खूप महत्वाचे आहे. आयपीएल 2021चे उर्वरित सामने 15 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर ‘गुरु’ द्रविडसह कर्णधार, उपकर्णधाराची खास मेजवाणी, फोटो भन्नाट व्हायरल

भारताच्या केवळ २० खेळाडूंना मिळाली ऑलिम्पिक उद्घाटनात सहभागी होण्याची परवानगी, हे असतील ध्वजवाहक

दोस्त दोस्त ना रहा! सराव सामन्यात सुंदरला बाद केल्यानंतर सिराजने केली स्लेजिंग; व्हिडिओ जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---