गुजरात टायटन्सचा गोलंदाजी अष्टपैलू राहुल तेवतिया मंगळवारी (4 एप्रिल) पुन्हा एकदा झळकला. आयपीएल 2023चा 7वा सामना मंगळवारी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय बऱ्याच अंशी योग्य देखील ठरवला. दिल्लीच्या डावाती 9व्या षटकात राहुल तेवतियाने एक अप्रतिम झेल पकडला.
दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात राहुल तेवतिया (Rahul Tewatia) पॉइंटवर फलंदाजीला थांबला होता. याठिकाणी तेवतियाने एक असा झेल पकडला, ज्याने चाहत्यांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडले. दिल्ली कॅपिट्लस संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आला होता. डावातील 9व्या षटकात अल्जारी जोसेफ गोलंदाजीला आला. जोसेफच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दिल्लीचा कर्णधार आणि सलामीवीर डेविड वॉर्नर () त्रिफळाचीत झाला. वॉर्नरने 32 चेंडूत 37 धावा करून विकेट गमावली.
त्यानंतर फलंदाजीला आला दक्षिण आफ्रिकेचा रायली रुसो. पण जोसेफने टाकलेल्या 146 किमी ताशी गतीच्या चेंडूवर रुसोने विकेट गमावली. जोसेफने टाकलेला हा चेंडू चांगलाच बाऊंस झाला, ज्याची रुसोला अपेक्षा नव्हती. रुसोला जोसेफचा हा चेंडू खेळता आला नाही. चेंडू बॅटला लागून पॉइंटच्या दिशेने उडाला. त्याठिकाणी क्षेत्ररक्षणाला उभा असलेल्या तेवतियाने मात्र जबरदस्त चपळाई दाखवली आणि झेल झेलला. तेवतियाने पकडलेला हा झेल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तेवतियाने हा झेल एवढ्या वेगात घेतला की, पंचांना देखील निर्णय देता आला नाही. मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे धाव घेतल्यानंतर गुजरातला ही विकेट मिळाली. रुसो पहिल्याच चेंडूवर एकही धाव न करता तेवतियाच्या हातात झेलबाद झाला. जोसेफने या षटकात लागोपाठ चेंडूवर दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि गुजरातची सामन्यातील स्थिती भक्कम केली. रुसोने विकेट गमावल्यानंतर दिल्लीची धावसंख्या 4 बाद 67 धावा होती.
https://twitter.com/12th_khiladi/status/1643268788429934595?s=20
गुजरातसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्जारी जोसेफने अनुक्रमे 3, 3 आणि 2 विकेट्स घेतल्या. सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या दिल्ली संघआने 8 बाद 162 धावा केल्या. (The umpire also had a question after seeing Rahul Tewatia’s tremendous catch, the video went viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यत्र तत्र सर्वत्र धोनी! तब्बल इतक्या कोटींचा टॅक्स भरत पार पाडली सामाजिक जबाबदारी
WC2023 । पाँटिंगची मोठी भाविष्यवाणी, ‘या’ दोघांमुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा बनवणार वर्ल्ड चॅम्पियन!