---Advertisement---

पंचांकडून लाईव्ह सामन्यात गडबड! निर्णय असा दिला की, गोलंदाजी करणाऱ्या संघालाच पडला प्रश्न

---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना बुधवारी (7 फेब्रुवारी) सिडनी क्रिकटे ग्राऊंडवर खेळला जात आहे. पावसाने व्यत्येय आणल्यामुळे हा सामना 50 ऐवजी 45 षटकांचा खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 25व्या षटकात एक अशी घटना घडली, ज्यामुळे मैदानातील प्रत्येक खेळाडू हसताना दिसली.

दक्षिण आफ्रिका संघाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 45 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर आफ्रिकेने 229 धावांपर्यंत मजल मारली. यादरम्यानच एक मजेशीर घटना घडली. उबय संघांतील या सामन्यात मैदानी पंच खेळाडू नॉट आऊट असताना त्याला आऊट करार देत होती. पण पुढच्याच क्षणी महिला पंच आपली चूक सुधरतानाही दिसली. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 24व्या षटकात हा प्रकार पाहायला मिळाला.

ऑस्ट्रेलियाकडून एश्ले गार्डनर या षटकात गोलंदाजी करत होती. षटकातील पाचवा चेंडू दक्षिण आफ्रिकेची फलंदाज सून लूस हिच्या पॅडवर लागला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून विकेटसाठी जोरदार अपील करण्यात आली. पण मैदानी पंचांकडून फलंदाज नाबाद असल्याचे सांगितले गेले. यानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली हिने डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये तिसऱ्या पंचांनी देखील पाहिले की, चेंडू स्टंप्सच्या खूप बाहेरून चालला होता. परिणामी फलंदाज नाबाद असल्याचे त्यांनी सांगितले. पण मैदानात उभ्या असलेल्या महिला पंचा हा निर्णय देताना गडबडल्या.

ऑस्ट्रेलियनाने डीआरएस गमावला होता. पण पंच गडबडल्यामुळे त्यांच्याकडून चुकून फलंदाज बाद असल्याचे इशारा दिला गेला. पंचांनी हाताचे बोट वरती केल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडला की, हे कसे शक्य आहे. पण आपली चूक लक्षात येताच पंच सॉरी म्हणताना दिसल्या. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा डीआरएस चुकल्याचा इशारा तत्काळ दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर पाहायला मिळत आहे. व्हिडिओतील ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या प्रतिक्रिया देखील चर्चेचा विषय ठरत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 
झिम्बाब्वे क्रिकेटला भारताचा नेहमीच पाठिंबा, पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा दौरा फिक्स
जसप्रीत जसबीर सिंग बुमराह! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ कारणामा पहिल्यांदाच, हलवली अख्खी ICC Ranking

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---