---Advertisement---

IND vs SA । ‘राम रिया राम’ गाण्यावर विराटने जोडले हात, केपटाऊन कसोटीतील व्हिडिओ तुफान व्हायरल

On: बुधवार, जानेवारी 3, 2024 6:20 PM
Virat Kohli
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बुधवारी केपटाऊनमध्ये सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका संघ भारतीय गोलंदाजांसमोर दुबळा वाटला. कारण पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 55 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. यादरम्यान, विराट कोहली याने मैदानातील मस्ती थांबवली नाही. विराटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केपटाऊन कसोटीत भारताने या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. 23.2 षटकांचा खेळ झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकने अवघ्या 55 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. काईल वेरेन याने 15 धावांची सर्वोत्तम खेळी या डावात केली. भारतासाठी मोहम्मद सिराज पुन्हा एकदा हिरो ठरला. सिराजने बुधवारी कसोटी कारकिर्दीतील तिसरा ‘फाईव्ह विकेट हॉल’ नावावर केला. सिराजने 9 षटकांमध्ये 15 धावा खर्च केल्यानंतर 6 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाचे गोलंदाज एकापाठोपाठ एक विकेट घेत असताना विराट कोहली (Virat Kohli) मात्र मैदानात नेहमीप्रमाणे आनंद लुटत होता.

केशव महाराज सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर मैदानात ‘राम सिया राम’ गाणे लागले. हे गाणे ऐकताच विराटने प्रभू श्रीरामांप्रमाणे धनुष्यबाण चालवताना दिसला. विराटने या गाण्यावर पुढे हात देखील जोडले. भारताचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदीर (Ram Mandir) प्राणप्रातिष्ठा होत आहे. विराट कोहील याला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचसोबत भारतीय संघाच्या सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि वेंकटेश प्रसाद यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाल्याचे समोर येत आहे. अशात प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी काही स्ट्राक क्रिकेटपटूही उपस्थित राहू शकतात. (The video of Virat Kohli joining hands on Ram Siya Ram song is currently going viral on social media)

केपटाऊन कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एलगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर

भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---