---Advertisement---

आनंदाची बातमी! पूर्ण होणार स्टेडियममधून आंतरराष्ट्रीय सामना पाहण्याचे प्रत्येकाचे स्वप्न, एमसीएची मोठी घोषणा

On: मंगळवार, डिसेंबर 5, 2023 8:34 PM
WanKhede Stadium
---Advertisement---

आपल्यापैकी अनेकांनी भारतीय संघाचा सामना स्टेडियममध्ये पाहिला आहे. अनेकांनी भारताचा नाही, पण दुसऱ्या कुठल्या संघांचा आंतरराष्ट्रीय सामना स्टेडियममध्ये पाहिला असू शकतो. पण आजपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना प्रत्यक्षात स्टेडियममध्ये जाऊन पाहू शकले नाही, अशांची संख्या देखील मोठी आहे. आता अशाच चाहत्यांसाठी पहिल्यांदा मैदानात जाऊन सामना पाहण्याची संधी चालून आली आहे.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) महिला संघ बुधवारी (6 डिसेंबर) आमने सामने असतील. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका आयोजित केली गेली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. पण त्याआधी मंगळवारी (5 डिसेंबर) मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून चाहत्यांसाठी खुशखबर मिळाली. उभय संघांतील हा पहिला आणि पुढचे दोन्ही टी-20 सामने चाहते वानखेडे स्टेडियममध्ये विनामुल्य पाहता येणार आहेत. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एमसीएने ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. अशात बुधवारी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये गर्दी जमण्याची शक्यता आहे.

एमसीएने केलेल्या पोस्टमध्ये चाहत्यांना सामन्याच्या तारखा लक्षात ठेवण्याचे आवाहन केले गेले आहे. एरवी चाहत्यांना आंतरराष्ट्रीय सामना स्टेडियमधून पाहण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सामन्यांसाठीही हजारो रुपये चाहते खर्च करत असतात. पण एका सामन्यासाठी हजारो रुपये खर्च करणे प्रत्येकाला परवडण्यासारखे नाही. अशात भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये होणाऱ्या या मालिकेत आंतरराष्ट्रीय सामना स्टेडियमधून पाहण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होताना दिसेल. (The Wankhede Stadium will offer free entry for the T20I series between India and England Women’s teams)

महत्वाच्या बातम्या – 
‘त्याचे कर्णधारपद मी काढून घेतले नाही…’, विराट कोहलीबाबत गांगुलींचा मोठा खुलासा
मिचौंग चक्रिवादळादरम्यान लोकल बॉय अश्विनचा चेन्नई शहराला खास मेसेज, मराठमोठा रहाणे म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---