सध्या वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेशविरूद्ध टी20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा 7 धावांनी धुव्वा उडवला होता. दरम्यान, सोमवारी (16 डिसेंबर) रोजी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने (West Indies Cricket Board) मोठी घोषणा करत माजी खेळाडू ‘डॅरेन सॅमी’ची (Daren Sammy) तिन्ही फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. पुढील वर्षी (1 एप्रिल) पासून तो ही सूत्रे हातात घेणार आहे.
डॅरेन सॅमी (Daren Sammy) सध्या वेस्ट इंडिजच्या वनडे आणि टी20 संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. दरम्यान, आंद्रे कोली हे कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्याची जागा सॅमी घेणार आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे क्रिकेट संचालक माइल्स बास्कोम्बे यांनी काही काळापूर्वी ही घोषणा केली होती. सॅमीची गणना वेस्ट इंडिजच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने 2 वेळा टी20 विश्वचषक जिंकला आहे.
कसोटी फॉरमॅटमधील त्याच्या कर्णधारपदाच्या रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 30 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान वेस्ट इंडिजने 8 सामने जिंकले तर 12 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी 10 सामने अनिर्णित राहिले होते.
‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या (ICC World Test Championship) या चक्रात वेस्ट इंडिज संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. वेस्ट इंडिजने आत्तापर्यंत 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. त्याचबरोबर 7 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असून 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून वेस्ट इंडिज आधीच बाहेर आहे. या चक्रात वेस्ट इंडिजला अजून 2 सामने खेळायचे आहेत, जे पाकिस्तानविरुद्ध होणार आहेत.
🚨 BREAKING 🚨
The West Indies Cricket Board confirms that Daren Sammy will be the head coach of the senior team in all formats starting from April 2025 🏏#Cricket #DarenSammy #WestIndies pic.twitter.com/qUZiU2Irr2
— Sportskeeda (@Sportskeeda) December 16, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी सुरू असतानाच ‘या’ भारतीय खेळाडूने घेतली निवृत्ती…!!!
भारतीय संघाची फलंदाजी फ्लाॅप ठरल्यानंतर, भडकला माजी खेळाडू! म्हणाला, “फलंदाजी प्रशिक्षक…”
IND vs AUS; मोहम्मद सिराजची ढाल बनला जसप्रीत बुमराह! म्हणाला…