विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह भारताचे अनेक मोठे कुस्तीपटू दिल्लीतील जंतर मंदरवर आंदोलन बसले आहेत. खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषण आणि इतर काही गंभीर आरोप करत या कुस्टीपटूंनी मागच्या चार महिन्यांपूर्वी हे आंदोलन छेडले होते. मात्र, अध्याप बृजभूषण सिंग यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने सर्व कुस्तीपटू पुन्हा एकदा एकत्र जमले आहेत. असे असले तरी, क्रिकेटविश्वातून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचेच पाहायला मिळाले. विनेश फोगाटने नेमका हाच मुद्दा धरून भारतीय क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे.
भारतीय कुस्तीपटू भाजप खासदार बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात पोलीस गुन्हा नोंदवून घेत नसल्याने एकत्र जमले होते. शुक्रवारी (28 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना बृजभूषण सिंगांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. बृजभूषण सिंग यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत हे खेळाडू उपोषण सुरू ठेवणार असल्याचे सांगितले गेले आहे. कुस्तीपटू एवढ्या दिवसांपासून आपल्याला न्याय मिळावा यासाठी झगडत आहेत, पण एकही क्रिकेटपटू त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत नाही, असे मत विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने व्यक्त केले. विनेशच्या मते खेळाडूंना न्याय मिळावा यासाठी कोणताच क्रिकेटपटू बोलत नसेल, तर देशासाठी पदक जिंकल्यानंतर देखील या क्रिकेटपटूंनी कुस्तीपटूंसाठी कोणती पोस्ट केली नाही पाहिजे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विनेश म्हणाला, “संपूर्ण देश क्रिकेटची पूजा करतो, पण एकाही क्रिकेटपटूने अजून काही बोलले नाहीये. तुम्ही आमच्या बाजूने बोला, असे आम्ही म्हणत नाही. पण किमान तटस्थ भूमिका मांडा. मला याच गोष्टीची अडचण आहे. आपल्या देशात मोठे खेळाडू नाहीत, असे नाहीये. अनेक क्रिकेटपटू आहेत… अमेरिकेतील ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनात त्यांनी समर्थन दाखवले. मग आम्ही या लायक नाहीत का?”
विनेश फोगाटचे भारतीय क्रिकेटपटूंवर ताशेरे –
“ते सर्वजण कशाला घाबरतात हे आम्हाला माहीत नाही. याविषयी वक्तव्य केल्यावर त्यांना मिळमारी स्पॉन्सरशिप जाण्याची चिंता त्याला असू शकते. शक्यतो त्यामुळेच ते स्वतःला आमच्यापासून लांब ठेवत आहेत, विरोध करत आहेत. पण या गोष्टी मला मान्य नाहीत. जेव्हा आम्ही काही जिंकतो, तेव्हा शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण पुढे येतात. क्रिकेटपटू देखील ट्वीट करतात. पण आता काय झालं? तुम्ही व्यवस्थेला घाबरता का? किंवा असेही असू शकते की, त्यांच्याकडेही (क्रिकेट संघ/व्यवस्थापन किंवा बीसीसीआय) काही गडबड असू शकते.”
“हे सर्वजण आपले फोटो टाकतात, वेगवेगळ्या ब्रँड्ससोबत कोलॅबोरेशन करतात. मग आमच्यासाठी एक पोस्ट टाकू शकत नाही? जर संघर्षाच्या काळात आम्ही त्यांच्या समर्थनाच्या लायक नसू, तर उद्या आम्ही देशासाठी पदक जिंकल्यानंतरही त्यांनी शुभेच्छा दिल्या नाही पाहिजे. मत असे म्हणून नका का, तुम्हाला आमच्या क्षमतेवर विश्वास होता. कारण तुम्हाला विश्वास नाहीये आणि त्यामुळेच आता तुम्ही आमच्यावर शंका व्यक्त करत आहात,” असेही विनेश म्हणाली.
दरम्यान, विनेशच्या या मुलाखतीनंतर भारतीय संघातील काही क्रिकेटपूंनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना समर्थन दिले आहे. यातमध्ये कपिल देव, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांच्या समावेश आहे.
Indian athletes are always our pride not only when they get medals for us…
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 28, 2023
बहुत दुःख की बात है की हमारे champions जिन्होंने देश का बड़ा नाम किया है , झंडा लहराया है , हम सबको इतनी ख़ुशियाँ दी हैं, उन्हें आज सड़क पर आना पड़ा है।
बड़ा संवेदनशील मामला है और इसकी निष्पक्ष जाँच होनी चाहिए। उम्मीद है खिलाड़ियों को न्याय मिलेगा। pic.twitter.com/A8KXqxbKZ4— Virender Sehwag (@virendersehwag) April 28, 2023
Sakshi, Vinesh are India's pride. I am pained as a sportsperson to find pride of our country coming out to protest on the streets. I pray that they get justice.#IStandWithWrestlers pic.twitter.com/hwD9dKSFNv
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 28, 2023
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत जेष्ट विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची बाजू मांडली. सरन्यायधीश डी पाय चंद्रचूड यांनी अद्याप बृजभूषण सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल न झाल्याने दिल्ली पोलिसांना नुसावले आणि तत्काळ गुन्हा नोंदवण्याच्या सुचना केल्या. सोबत या अल्पवयीन कुस्तीपटूंना सुरक्षा देण्याचेही आदेश दिले. (“The whole country worships cricket, so why not a single cricketer with us?” said Vinesh Phogat)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युवराजच्या वडिलांचे अर्जुनबाबात धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘…तर क्रिकेटचे मोठे नुकसान होईल’
अखेर बृजभूषण सिंग यांच्यावर दाखल होणार FIR, दिरंगाईबाबत सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांवर ताशेरे