---Advertisement---

WTC Final Prize Money: विजेता मालामाल होणारंच, पण उपविजेत्याचाही भरणार खिसा; आकडा वाचून येईल आकडी

On: सोमवार, जून 5, 2023 1:52 PM
WTC-Final-Money-Price
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया लवकरच जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळण्यासाठी आमनेसामने येतील. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. 2021-2023 दरम्यानच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

कसोटी क्रिकेट रोमांचक करण्याच्या उद्देशाने आयसीसीने या अजिंक्यपदाची सुरुवात केली. या स्पर्धेमध्ये कसोटी सामने आणि मालिकेच्या आधारे संघांना गुण दिले जातात. त्यानंतर दोन संघांमध्ये विजेतेपदाचा सामना खेळवला जातो. 2021 मध्ये भारताने चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती. तेथे संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. (India vs Australia)

ड्यूक बॉलने खेळला जाणार सामना
यावेळी सामना ड्यूक बॉलने खेळवला जाणार आहे. ड्यूक्स बॉलचा वापर इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजच्या कसोटी क्रिकेटमध्ये केला जातो. याआधी हे सामने लॉर्ड्सवर होणार होते पण आता ते ओव्हलवर खेळवले जात आहेत. आयसीसीला प्रायोजकत्वाच्या दृष्टीने हा सामना स्वच्छ जागेवर खेळला जाईल. लॉर्ड्सचे काही सौदे आहेत त्यामुळे येथे सामना खेळता येणार नाही.

2021 चा अंतिम सामना देखील लॉर्ड्सवर खेळवला जाणार होता. परंतु कोविड -19 मुळे ते साउथम्प्टन येथे हलविण्यात आले होते. येथे बायो-बबल रोखून धरणे सोपे होते. दरम्यान, जूनमध्ये ओव्हलवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळवला जात आहे. यापूर्वी या मैदानावर जून महिन्यात एकही कसोटी सामना खेळला गेला नव्हता.

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे. जर हवामानामुळे खेळ एका दिवसापेक्षा जास्त काळ चालला तर सामना सहाव्या दिवशी खेळला जाईल. 2019-21 चा अंतिम सामनाही राखीव दिवशी खेळण्यात आला होता. तिथे न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

सामन्यावेळी हवामन कसे असेल
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी (World Test Championship) हवामान कसे असेल याबाबत आपण माहिती घेऊयात. पहिले तीन दिवस हवामान स्वच्छ असेल पण चौथ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत सामना राखीव दिवशी खेळवला जाऊ शकतो. जर सामना सहाव्या दिवशी खेळवला गेला तरीही या दिवशी हवामान स्वच्छ असणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या बक्षीसाबद्दल बोलायचे झाले तर, विजेत्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 13 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, उपविजेत्याला 8 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 6.5 कोटी रुपये मिळतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---