---Advertisement---

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘मालिकावीर’ पुरस्कार सचिनच्या नावावर, आता विराटने त्याचीही केली बरोबरी

On: रविवार, जानेवारी 15, 2023 8:56 PM
Virat-Kohli-MOS
---Advertisement---

भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंका संघाला क्लीन स्वीप दिला आहे. भारतीय संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाची दाणादाण उडवली. रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने तब्बल 317 धावांनी विजय मिळवला. हा वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने या सामन्यात दीडशतकी खेळी करत विक्रमांची भींतच उभी केली. या विक्रमात त्याने सचिन तेंडुलकर याची बरोबरी केली आहे.

भारताच्या धावसंख्येत विराटचा सिंहाचा वाटा
तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने भारतीय संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 110 चेंडूत 8 षटकार आणि 13 चौकारांचा पाऊस पाडत सर्वाधिक नाबाद 166 धावा कुटल्या. या धावा केल्यामुळे भारतीय संघाची धावसंख्या 5 विकेट्स गमावत निर्धारित 20 षटकात 390 धावांपर्यंत पोहोचली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा डाव 22 षटकात 73 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताना 317 धावांनी विजय मिळवला.

विराट कोहलीची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
यासह विराटने केलेल्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, त्याने या वनडे मालिकेत केलेल्या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. यासोबतच विराटने आतापर्यंत सर्व क्रिकेट प्रकारात तब्बल 20 वेळा मालिकावीर पुरस्कार पटकावण्याचा कारनामा केला. यासह त्याने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी साधली. विराटने कसोटीत 3वेळा, वनडेत 10 वेळा आणि आंतरराष्ट्रीय टी20त 7 वेळा हा कारनामा केला आहे.

विराटपूर्वी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारात सर्वाधिक वेळा 20 मालिकावीर पुरस्कार पटकावण्याचा विक्रम केला होता. सचिनने कसोटीत 5 वेळा, तर वनडेत 15 वेळा मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. (Most ‘Man of the Series’ awards in international cricket history)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू
20 वेळा- विराट कोहली*

20 वेळा- सचिन तेंडुलकर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानातूनही विराटचे कौतुक! दिग्गज म्हणतोय, “तू या युगाचा बॉस”
जागतिक क्रिकेटमध्ये विराटचा दबदबा! विरोधी संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम केला नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---