आगामी इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. तत्पूर्वी (24 आणि 25 नोव्हेंबर) रोजी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव (Mega Auction) आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएलसाठी हा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. त्यासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. यामध्ये सर्वात तरूण खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Suryavanshi) नावाचा समावेश आहे. जो फक्त 13 वर्षांचा आहे.
आयपीएल मेगा लिलावाच्या अंतिम खेळाडूंच्या यादीत वैभवच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तो 30 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या यादीत सामील झाला. वैभव आतापर्यंत अनेक देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळला आहे. त्याने रणजी ट्राॅफी, कूचबिहार ट्राॅफी आणि विनू मांकड ट्रॉफीमध्ये भाग घेतला आहे. यासोबतच त्याची भारताच्या अंडर-19 संघातही निवड झाली होती.
विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही उत्कृष्ट आहे. तो डावखुरा गोलंदाज आहे.
यंदाच्या मेगा लिलावात (Mega Auction) सर्वात तरूण खेळाडू आणि सर्वात वयस्कर खेळाडू पाहायला मिळणार आहेत. या यादीत सर्वात तरूण खेळाडू वैभव सूर्यवंशी (वय 13 वर्ष) आहे. तर सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) (वय 42 वर्ष) असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीत ‘या’ 3 खेळाडूंचा चिंताग्रस्त फाॅर्म वाढवणार भारतीय संघाचं टेन्शन!
IND vs SA; भारताने जिंकला टाॅस प्रथम फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवलं, या स्पर्धेत सांभाळणार महत्त्वाची जबाबदारी