आगामी आयसीसी वनडे विश्वचषकापूर्वी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (23 सप्टेंबर) मिरपूरमध्ये खेळला जात असताना मैदानात नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. न्यूझीलंडचा ईश सोढी डावातील 46व्या षटकात नॉन स्ट्राईक एंडवर धावबाद झाला होता. पण कर्णधार लिटन दास याने त्याला पुन्हा खेळण्यासाठी बोलावले.
नॉन स्ट्राईक एंडवरील फलंदाज अनेकदा गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच क्रीजच्या बाहेर आलेला असतो. पण गोलंदाजाने चपळाई दाखवली, तर बहुतांश वेळा फलंदाजाला अशा प्रसंगी धावबाद व्हावे लागते. शनिवारी (23 सप्टेंबर) बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. हसन महमूद याने न्यूझीलंडच्या डावातील 46 व्या षटकात गोलंदाजी केली. षटकातील तिसऱ्या चेंडूवर हसनने नॉन स्ट्राईक एंडवरून चेंडू टाकण्याऐवजी ईश सोढी (Ish Sodhi) याला धावबाद केले. पंचांकडे विकेटसाठी अपील केली. पंचांचा निर्णय देखील बांगलादेशच्या बाजूने होता.
मात्र, बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याला मैदानातील हा प्रकार पटला नाही. कर्णधाराने कठोर निर्णय घेतल विकेट गमावलेल्या सोढीला खेळण्यासाठी मैदानात पुन्हा बोलावले. सोढीनेही मैदानात परतल्यानंतर खेळाडू वृत्ती दाखवली आणि विकेट घेणाऱ्या हसन महमूद याची गळाभेट घेतला. सोशल मीडियावर हा सगळा नाट्यमय प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चाहते आणि जानकार देखील याविषयी बोलताना दिसत आहेत. आयसीसी आणि एमसीएकडून अशा प्रकारे धावबाद करण्याला परवानगी मिळाली असताना लिटन दासने सोढीला बोलवण्याची गरज काय होती? असाही प्रश्न अनेकांनी विचारला आहे.
Hasan Mahmud run-out Sodhi in the non-striker end for backing too much.
The third umpire says it’s “out”.
Then Bangladesh decides to call him back and Sodhi hugs Hasan Mahmud.
Incredible scenes in Dhaka….!!!! pic.twitter.com/RliUOkpeKA
— Johns. (@CricCrazyJohns) September 23, 2023
(Then Bangladesh decides to call Sodhi back and Sodhi hugs Hasan Mahmud)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान संघात पुनरागमन करू शकतो मोहम्मद आमिर! मुख्य निवडकर्त्यांनीच सांगितले…
विश्वचषक कमी, पण शतके जास्त! रोहितचा World Cupमधील भन्नाट Record, 2023मध्ये भीमपराक्रम करण्याची संधी