‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा याच्या कारकीर्दीला आतापर्यंत 16 वर्षे झाली आहेत. त्याने जून 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या 16 वर्षांमध्ये रोहितने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आता वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा तोंडावर (5 ऑक्टोबर) आली आहे. अशात बऱ्याच क्रिकेटप्रेमींना माहिती नाही की, रोहित कोणत्या विश्वचषकात सर्वाधिक चमकला आहे. चला तर, वनडे विश्वचषकातील त्याच्या कामगिरीचा आढावा घेऊयात…
रोहित शर्मा किती विश्वचषक खेळला?
भारतीय संघाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आतापर्यंत 2 विश्वचषक (World Cup) स्पर्धेत खेळला आहे. त्यात विश्वचषक 2015 (World Cup 2015) आणि विश्वचषक 2019 (World Cup 2019) यांचा समावेश आहे.
विश्वचषकातील कामगिरी
रोहितची या दोन्ही विश्वचषकातील कामगिरी पाहायची झाली, तर त्याने 2015च्या विश्वचषकात 8 सामने खेळताना 47.14च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. यात एक शतकाचाही समावेश आहे. यादरम्यान 137 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. याव्यतिरिक्त 2019चा विश्वचषक रोहित शर्मा याच्यासाठी खूपच खास ठरला होता. त्याने 9 सामने खेळताना 81च्या सरासरीने सर्वाधिक 648 धावा केल्या होत्या. यात रोहितने 5 शतके ठोकली होती. यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ही 140 इतकी होती. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक 5 शतके ठोकण्याचा विक्रमही रोहितच्याच नावावर आहे.
मोठ्या विक्रमाची संधी
या दोन्ही विश्वचषकात मिळून त्याने 17 सामने खेळताना 65.20च्या सरासरीने 978 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 शतके आणि 3 अर्धशतके निघाली आहेत. विशेष म्हणजे, रोहितकडे वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत खास विक्रम रचण्याची संधी आहे. वनडे विश्वचषकात 1000 धावा करण्यासाठी त्याला फक्त 22 धावांची गरज आहे. जर त्याने या धावा केल्या, तर तो विश्वचषकात 1000 धावा करणारा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यानंतर चौथा भारतीय होईल.
सध्याची कामगिरी
रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत खेळला होता. त्याने या स्पर्धेत एकूण 6 सामन्यांतील 5 डावात फलंदाजी करताना 48.50च्या सरासरीने 194 धावा केल्या. यामध्ये नाबाद 74 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. विशेष म्हणजे, स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा सहावा क्रमांक लागतो.
रोहितची वनडे कारकीर्द
कर्णधार म्हणून पहिलाच वनडे विश्वचषक खेळणाऱ्या रोहित शर्मा याच्या वनडे कारकीर्दीवर नजर टाकायची झाली, तर त्याने 250 वनडे सामन्यांतील 242 डावात फलंदाजी करताना 48.69च्या सरासरीने 10031 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितने 30 शतके आणि 51 अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, वनडेत सर्वाधिक 3 द्विशतक करण्याचा विक्रमही रोहितच्याच नावावर आहे. अशात रोहित शर्मा याच्याकडून विश्वचषक 2023मध्येही भारतीय संघाला शानदार कामगिरीची अपेक्षा असेल. (special story about Rohit Sharma world cup records and performance)
विश्वचषक विशेष-
वर्ल्डकप 2019 मध्ये घडलेले सर्व विक्रम, रोहित-वॉर्नरकडे यावर्षी मोठी संधी
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
किस्से वर्ल्डकपचे: त्यादिवशी चिन्नास्वामीवर केविन ओब्रायनने इंग्लडला गुडघ्यावर आणलेलं
World Cup 2023 Preview: 10 संघांपासून ते सामन्यांच्या ठिकाणांपर्यंत, सर्व माहिती एकाच क्लिकवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा
विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, हुकमी एक्का बाहेर; 15 महिन्यांनंतर ‘या’ धुरंधराचे कमबॅक