एमएस धोनीची पत्नी साक्षी हिने गुरुवारी (19 नोव्हेंबर) तिचा 32 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चेन्नई सुपर किंग्जने तिचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिचा पती एमएस धोनी सोबत असलेल्या नात्यावर भाष्य केले. क्रिकेटबद्दल आम्ही फारशा चर्चा करीत नाही तो त्याचा पेशा आहे, असे साक्षी या व्हडिओमधून सांगते.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पाय ठेवला. त्यावेळी त्याच्या सुरुवातीच्या दिवसातील लांब केसांची स्टाईल बरीच फेमस झाली होती. त्याच्या केशरी रंगाच्या लांब केसांच्या स्टाईलचे तेव्हा लाखो चाहते होते. पण 2007 च्या टी20 विश्वचषकानंतर त्याने त्याचे लांब केस काढून टाकले.
एमएस धोनीने केस बारीक करण्याचे कारण कोणीही सांगू शकत नाही. पण आता धोनीने लांब केस कापण्यामागे त्याची पत्नी साक्षी असल्याचा अंदाज अनेकांनी लावला आहे. कारण चेन्नईने तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने म्हटले आहे की तिला लांब केस बिलकूल आवडले नसते.
ती या व्हि़डिओमध्ये म्हटली की ‘बरं आहे की मी त्याला कधीही लांब केसात पाहिले नाही. जर तो मला लांब केशरी रंगाचे केस असताना भेटायला आला असता तर मी कदाचित त्याच्याकडे पाहिले देखील नसते. त्याला ते लांब केस बिलकुल शोभा देत नाही”.
"Cricket is his priority, he's my priority!" The Super Queen behind the Super King. 🦁💛 #SuperBirthday @SaakshiSRawat #WhistlePodu pic.twitter.com/K7SJ7ejStc
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 19, 2020
साक्षी या व्हिडिओमध्ये असेही म्हणाली की, “आम्ही कधीही क्रिकेटवर चर्चा करीत नाही. कारण क्रिकेट हा त्याचा पेशा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सोपी खेळपट्टी मिळणार? पाहा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू काय म्हणतोय
… तर आम्ही विराटच्या मुलाला ऑस्ट्रेलियन म्हटले असते – ऍलन बॉर्डर
‘हा’ आंतरराष्ट्रीय संघ नाही करणार ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ मोहिमेचे समर्थन