---Advertisement---

“तेव्हा भारतीय चाहते रोहितला शिवीगाळ करत होते…”, माजी भारतीय खेळाडूने सांगितली भयानक घटना

Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा हा खूप मस्त क्रिकेटर मानला जातो आणि तो मैदानावर क्वचितच रागावलेला दिसला आहे. पण रोहितला जेव्हा राग येतो तेव्हा त्याच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण होऊन बसतं आणि याच कारणामुळे तो अनेकदा विरोधी खेळाडूंशी आणि चाहत्यांशीही भिडला आहे.

2011-12 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) सराव करत असताना अशीच एक घटना घडली होती आणि त्याचवेळी तो एका चाहत्याशी भिडला होता. हे प्रकरण इतके वाढले होते की, ते शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचले होते आणि रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

रोहित ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सराव करत असतानाची ही गोष्ट आहे. या सराव सत्रात मनोज तिवारी (manoj Tiwari) आणि प्रवीण कुमार (Praveen Kumar) हेही त्याच्यासोबत होते. नेट सेशनमध्ये रोहित बॅटिंग करत असताना नेटच्या मागे उभ्या असलेल्या एका चाहत्याने रोहितला काहीतरी बोलले, ज्यामुळे हिटमॅनला खूप राग आला आणि त्याने त्याला बॅटने मारण्याचेही बोलले.

यावेळी रोहितचा राग एवढा अनियंत्रित झाला की, त्याने त्या चाहत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर भांडण पाहून प्रवीण कुमार हाही तेथे आला आणि त्यानेही रोहितसोबत त्या चाहत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या चाहत्याला मारण्यासाठी कुमारने एक स्टंपही उखडून टाकला होता. तो चाहता मद्यधुंद अवस्थेत होता आणि रोहितला अनेक चुकीच्या गोष्टी सांगत होता, त्यामुळे रोहितचा राग वाढला होता.

Rohit Sharma   Praveen Kumar abusing indian fans.mp4

याबद्दल सांगताना प्रविण कुमार म्हणाला, “माझे कधी कोणाशी भांडण झाले नाही. तिथे आम्ही तिघे होतो, मी, रोहित शर्मा आणि मनोज तिवारी. आम्ही ब्रिस्बेनमध्ये सराव करत होतो. त्यावेळी आमचेच लोक आम्हाला शिवीगाळ करत होते. जे रोहित शर्माला शिव्या देत होते. त्यावर त्याचा संयम सुटला आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि मीही त्यात सामील झालो.” (Then the Indian fans were abusing Rohit the former Indian player recounted the horrific incident)

हेही वाचा

T20 World Cup: राहुल की पंत? गावसकरांनी निवडला टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय यष्टिरक्षक
YSRCP सोडल्यानंतर रायुडू करणार JSPमध्ये प्रवेश?, पवन कल्याणसोबतचे फोटो शेअर करत दिले संकेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---