सध्या भारत आणि न्यूझीलंड या संघादरम्यान टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना गुरूवारी (दि. 17 नोव्हेंबर) वेलिंग्टन येथे खेळवला जाणार होता. मात्र, हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) बे ओवल या मैदानावर खेळवला जाणार असून हा सामना देखील पावसामुळे रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
न्यूझीलंडमधील स्थानिक हवामान विभागाच्या अहवालानुसार दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने क्रिकेट रसिक नाराज झाले आणि दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट असल्यानेे चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाऊ शकते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान माउंट मांउगानुईमधील बे ओवल या ठिकाणी होणार आहे. माउंगानुई या ठिकाणी सध्या रिमझिम पाऊस सुरू असून सामन्याच्या दिवशी पावसाची जास्त शक्यता. या सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता दिवसा 89 टक्के तर रात्री 42 टक्के आहे. भारत आणि न्यूझीलंड संघादरम्याचा हा सामना रात्री असून पाऊस होण्याची पुरेपुर शक्यता आहे.
जर भारत आणि न्यूझीलंडमधील हा सामना देखील पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला तर तिसरा सामना निर्णायक ठरणार आणि तिसरा सामना जिंकणारा संघ मालिकाही खिशात घालेल.
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत होऊन आले असून ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या टी20 मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यांचीही मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तिसरा सामना नेपियर या ठिकाणी खेळवला जाणार असून या ठिकाणी हवामान सध्यातरी स्वच्छ आहे. हा सामना जर स्वच्छ वातावरणात खेळला गेला तर चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असेल.(There are possibilities of heavy rain in the second t20 match between India vs New Zealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू जो मिला…’, टीम इंडियाच्या ‘गब्बर’ची मुलगा झोरावरसोबत जोरदार मस्ती, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
पदार्पणात फ्लॉप ठरलेल्या गिलच्या पाठीवर धोनीने ठेवलेला हात; स्वतः सांगितला तो किस्सा