गुजरातमध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा देखील निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसले. जडेजाची पत्नी रिवाबा यावेळी स्वतः विधानसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावणार आहे. पण निवडणुकीचपूर्वी जडेजा कुटुंबियांमध्येच फुट पडल्याचे दिसत आहे. रविंद्र जडेजाचे वडील आणि रिवाबाचे सारसे अनिरुद्ध सिंग जडेजा स्वतः त्यांच्या सुनेच्या विरोधात प्रचार करताना दिसले.
गुजरात विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा गुरुवारी (1 डिसेंबर) पार पडणार आहे. मंगळवारी (29 नोव्हेंबक) पहिल्या टप्प्यासाठी प्राचार करण्याची शेवटची तारीख होती. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रिवाबा (Rivaba Jadeja) जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार मानली जात आहे. पण तिचे सासरे अनिरुद्ध सिंग जडेजा (Anirudha Singh Jadeja) मात्र सुनेचा विरोधात प्रचार करताना दिसले. मंगळवारी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. व्हिडिओत अनिरुद्ध सिंग जडेजा कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याची मागणी मतदारांकडे करत आहेत.
दरम्यान जामनगर उत्तर विधानसभा जागेसाठी भाजपने दिग्गज धर्मेंद्र सिंग जडेजा यांचे तिकिट कापून रविंद्र जडेजाच्या पत्नीला उमेदरावरी दिली. अशातच आता जडेजाचे वडील आणि बहीन त्यांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत. जडेजाची बहीण नयनाब देखील तिची वहिनी रिवाबाच्या विरोधात मोर्चा बांधताना दिसली आहे. नयनाबा जामनगर मतदारसंघात कॉंग्रेससाठीच प्रचार करताना दिसली. दरम्यान, जडेजाच्या वहिलांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ravindra Jadeja's father appealed the people of Jamnagar to vote in the favour of Congress candidate.
Ravindra Jadeja's wife is also contesting from the same seat with BJP's ticket. pic.twitter.com/BopuwnfQct
— Ankit Mayank (@mr_mayank) November 29, 2022
दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होणार आहे, ज्यासाठी एकूण 788 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या 788 उमेदवारांमध्ये महिलांची संख्या अवघी 70 आहे. यापूर्वी गुजरात नियवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात टक्कर असायची, पण यावेळी अरविंद्र केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष देखील स्पर्धेत आहे. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी 89-89 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर आपचे 88 उमेदवार पहिल्या टप्प्यात नशीब आजमावणार आहेत. (There are two groups in the Jadeja family! Campaigning for Congress by father and sister while wife is BJP candidate)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंडिया ए ‘यशस्वी’ भव! जयस्वाल-अभिमन्यूच्या शतकांनी बांगलादेश बॅकफुटवर
पंतच्या उलट्या बोंबा! सतत फ्लॉप ठरल्यानंतर म्हणतोय, “माझी तुलना करू नका”