क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गज गोलंदाज होऊन गेले ज्यांनी त्यांच्या धारदार गोलंदाजीनं क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. अनेक गोलंदाजांना कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळाले, तर काही गोलंदाज वनडेत हिरो ठरले. लाल आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये यश मिळवणारे अनेक गोलंदाज होते. या बातमीद्वारे आपण वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे या टॉप-5 यादीत एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.
मुथय्या मुरलीधरन- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) पहिल्या स्थानावर आहे. मुरलीधरननं 350 एकदिवसीय सामन्यांच्या 341 डावांमध्ये गोलंदाजी केली आणि 23.08 च्या सरासरीनं 534 विकेट्स घेतल्या. मुरलीधरन हा कसोटीत देखील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्यानं कसोटीत 800 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत.
वसीम अक्रम- एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) दुसऱ्या स्थानावर आहे. या पाकिस्तानी दिग्गजानं 356 एकदिवसीय सामन्यांच्या 351 डावात गोलंदाजी केली आणि धमाकेदार गोलंदाजी करत 23.52 च्या इकॉनॉमीने 502 विकेट घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 विकेट्सचा टप्पा पार करणारा वसीम अक्रम (Wasim Akram) हा दुसरा गोलंदाज आहे.
वकार युनूस- या यादीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस (Waqar Younis) तिसऱ्या क्रमांकावर आहे. वकार युनूसनं 262 एकदिवसीय सामन्यांच्या 258 डावात 23.84 च्या सरासरीनं 416 विकेट घेतल्या आहेत.
चामिंडा वास- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास (Chaminda Vaas) चौथ्या स्थानावर आहे. चामिंडा वासनं 322 एकदिवसीय सामन्यांच्या 320 डावात गोलंदाजी केली आणि दमदार प्रदर्शन करत 400 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
शाहिद आफ्रिदी- पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. आफ्रिदीनं 398 एकदिवसीय सामन्यांच्या 372 डावांमध्ये गोलंदाजी केली आणि 34.51च्या सरासरीनं चमकदार गोलंदाजी करत 395 विकेट्स घेतल्या.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टाॅप-5 गोलंदाजांमध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचं नाव नाही. या यादीत 3 पाकिस्तानी खेळाडू आहेत, तर 2 श्रीलंकन खेळाडूंचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्युनियर वॉल! राहुल द्रविडच्या मुलाचा रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये गगनचुंबी षटकार – Video
अडचणीच्या काळात हार्दिकच्या पाठीशी ठामपणे उभा होता मुंबई इंडियन्स संघ, बुमराहने सांगितलं सर्वकाही
काय सांगता..! दिग्गज फुटबाॅलपटू रोनाल्डो एमएस धोनीचा चाहता?