आयपीएल२०२० मधील ३६ वा सामना रविवारी (१८ ऑक्टोबर) दुबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. या सामन्यात २ सुपर ओव्हर झाल्या. सामना बरोबरीत सुटल्याने पहिली सुपर ओव्हर झाली. परंतु पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्याने दुसरी सुपर ओव्हर घेण्यात आली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारली आणि सामना खिशात घातला. या विजयानंतर कर्णधार केएल राहुलने एका चाहत्याच्या कमेंटला खास प्रत्युत्तर दिले आहे.
झाले असे की, मुंबईविरुद्ध दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकल्यानंतर राहुलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सामन्यादरम्यानचे दोन फोटो शेअर केले. या फोटोला कॅप्शन देत राहुलने लिहिले की, “आठवणीत राहण्यासारखी रात्र.”
A night to remember ❤️ pic.twitter.com/hn3uQaB4JB
— K L Rahul (@klrahul) October 18, 2020
या पोस्टवर एका चाहत्याने राहुलने क्विंटन डॉ कॉकला बाद केलेल्या फोटोचा कमेंटमध्ये समावेश करत लिहिले की, “माझा थाला.”
There is only one Thala Gajal and everyone knows who he is. 🙏
— K L Rahul (@klrahul) October 19, 2020
चाहत्याच्या या कमेंटवर राहुलने प्रत्युत्तर देत लिहिले की, “थाला फक्त एकच आहे. आणि सर्वांना माहिती आहे की, तो कोण आहे.”
खरं तर क्विंटन डी कॉकची विकेट पंजाबसाठी खूप महत्त्वाची होती. आणि राहुलने त्याला धावबाद केले होते. त्यामुळे चाहत्याने त्याला ‘थाला’ असे म्हटले. परंतु खरं तर ‘थाला’ या नावाने धोनीला ओळखतात. त्यामुळे राहुलने चाहत्यांच्या कमेंटवर असे प्रत्युत्तर दिले.
मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलने ५१ चेंडूत सर्वाधिक ७७ धावा कुटल्या. यामध्ये ३ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा पुढील सामना मंगळवारी (२० ऑक्टोबर) दुबई येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहित, रैना, विराटलाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते केएल राहुलने करुन दाखवले
-IPL 2020 : केएल राहुलकडे ऑरेंज कॅप कायम; तर पर्पल कॅपचा मानकरी ‘हा’ खेळाडू
-पंजाबचा कमनशीबी शिलेदार! संघ मागे पण फलंदाजीच्या ‘मोठ्या’ विक्रमात राहुल सर्वांच्या पुढे
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-सुपर ओव्हर टाकायचीये? पाहा प्रत्येक संघातील ‘अशा’ खास खेळाडूंची नावे
-मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या