---Advertisement---

मुंबई इंडियन्ससोबत नेहमी असं‌ का होतं? आर अश्विनच्या विधानाने चाहत्यांमध्ये खळबळ!

On: रविवार, जून 1, 2025 4:38 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये रविवार (1 जून) रोजी दुसरा क्वालिफायर सामना पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स (punjab kings vs mumbai indians) संघांमध्ये होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचेल, तसेच पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. या सामन्याआधी दिग्गज भारतीय खेळाडू आर अश्विनने (R Ashwin) पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) गंभीर प्रश्न उपस्थित करत एक मोठे विधान केले आहे.

अश्विन सीनियर जर्नालिस्ट विमल कुमार यांच्यासोबत बोलताना म्हटले, मुंबईला नशिबाची एवढी साथ कशी मिळते. अश्विनने हा उल्लेख करत एलिमिनेटर सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma vs Gujrat Titans) गुजरात विरुद्ध तीन-तीन जीवनदान मिळाले. त्याचसोबत 2018 मधील एका सामन्याचे उदाहरण सुद्धा त्याने दिले. जेव्हा तो 2018 मध्ये पंजाब किंग्सचा (Punjab kings) कर्णधार होता.

तो म्हणाला, जेव्हा 2018 मध्ये पंजाब किंग्सचा मी कर्णधार होतो, तेव्हा मुंबई इंडियन्स विरुद्ध एका सामन्यात आम्ही त्यांचा स्कोर 80/5 केला होता. पण तेव्हा अचानक फ्लडलाइट्स बंद झाल्या आणि जवळजवळ 20 मिनिटांपर्यंत सामना थांबवण्यात आला. जेव्हा सामना परत सुरु झाला तेव्हा मुंबईने 180 पेक्षा जास्त धावा केल्या. अश्विनच हे म्हणणं सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे आणि क्रिकेट प्रेमींसाठी चर्चेचा विषय देखील बनला आहे.

अश्विनच्या म्हणण्यात हे स्पष्ट होतं की, त्या अचानक ब्रेकने पंजाबच्या गोलंदाजांची लय बिघडवली, ज्या कारणाने मुंबईच्या फलंदाजांना सेट होण्याचा टाईम मिळाला. अश्विनने सरळ पद्धतीने कोणावरही आरोप केला नाही. पण त्याच्या म्हणण्यात स्पष्ट येत आहे की, त्या घटनेला ते पूर्णपणे सामान्य मानत नाहीत. तो म्हणाला, सर्वांचे नशीब असते. पण मुंबई सोबत नेहमीच असं का होतं? हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. ते एवढं नशीब कुठून घेऊन येतात. त्यांच्यासोबत काही ना काही होतच राहत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---