भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघाची घोषणा देखील झाली आहे. दोन्ही संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी (16 ऑक्टोबर) रोजी बेंगळुरूच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसू शकतो. कारण भारताच्या स्टार खेळाडूच्या खेळण्यावर अद्याप सस्पेन्स आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिलची (Shubman Gill) मान अकडली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून त्याने आपले बहुतेक प्रशिक्षण फिजिओच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अद्याप यावर भाष्य केले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर गिल पहिला सामना खेळला नाही, तर प्रतिभावान 26 वर्षीय सरफराज खानला (Sarfaraz Khan) त्याच्या जागी संधी मिळू शकते. त्याने या वर्षाच्या सुरुवातीलाच इंग्लंडविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान त्याने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3 सामने खेळले. यावेळी 50च्या सरासरीने सरफराजने 200 धावा केल्या. अलीकडेच सरफराज खानने (Sarfaraz Khan) इराणी चषक (Irani Trophy) स्पर्धेत मुंबईसाठी द्विशतक झळकावले आहे.
3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ- भारत- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप
न्यूझीलंड- डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, मार्क चॅपमन, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, टॉम ब्लंडेल (उपकर्णधार), टॉम लॅथम (कर्णधार), एजाज पटेल, जेकब डफी, मॅट हेन्री, टिम साउथी, विल ओरुर्के
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs ENG; बाबर आझमचे पुनरागमनाचे दरवाजे बंद? बदली खेळाडूने ठोकले शानदार शतक
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत कर्णधाराचे मोठे अपडेट, AUS दौऱ्यातूनही बाहेर?
IND VS NZ; कसोटीच्या रणसंग्रमाला उद्यापासून सुरुवात, हाॅटस्टार नाही तर या ठिकाणी पाहा लाईव्ह सामना