---Advertisement---

Asia Cup: ‘भारतासाठी खेळायला ‘हा’ खेळाडू उतावीळ नाही’, जाणून घ्या दिनेश कार्तिक कोणाबद्दल म्हणाला?

On: मंगळवार, सप्टेंबर 2, 2025 5:59 PM
---Advertisement---

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने ज्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, त्यात जितेश शर्माचाही (Jitesh Sharma) समावेश आहे. जितेश संघात दुसरा विकेटकीपर आहे आणि शुबमन गिलला (Shubman gill) या स्पर्धेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले असल्यामुळे जितेशच्या खेळण्याची शक्यता अधिक आहे. प्लेइंग इलेव्हनच्या गणितात जितेश सहज बसतो आणि त्यामुळे संजूला (Sanju Samson) बाहेर राहावे लागू शकते.

जितेशने आयपीएल 2025 मध्ये जबरदस्त खेळ दाखवला होता. मधल्या फळीत त्याने आक्रमक फलंदाजी करत संघाच्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला. जितेशने 2023 मध्ये भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 9 सामने खेळले, मात्र त्याला नंतर संघातून वगळण्यात आले. पण आता पुन्हा एकदा त्याला संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाजी प्रशिक्षक व मार्गदर्शक असलेले दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांनी खुलासा केला आहे की, भारतासाठी खेळायचे या विचाराने जितेश स्वतःवर कधीही जास्त दबाव आणू इच्छित नव्हता आणि हाच त्याचा दृष्टिकोन त्याच्या खेळात फायदेशीर ठरला. आयपीएल 2025 मध्ये जितेशने 37.29 च्या सरासरीने व 176.35 च्या स्ट्राईक रेटने 261 धावा केल्या आणि फिनिशरची भूमिका उत्तमरीत्या बजावली.

क्रिकबझशी बोलताना जितेश म्हणाला, मला चांगले प्रदर्शन करायचे आहे. हो, नक्कीच मला भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. पण मी त्या विचारात फार अडकू इच्छित नाही, किंवा इतका दबाव आणू इच्छित नाही की खेळण्यातला आनंदच निघून जाईल.

धर्मशाळेत जितेशशी झालेल्या भेटीची आठवण काढत कार्तिक म्हणाला, तो असा खेळाडू कधीच नव्हता जो भारतासाठी खेळायला फारच बेताल होता. तो नेहमीच मोकळेपणाने खेळला, किंग्ससाठी आत्मविश्वासाने खेळ करत भारतीय संघात स्थान मिळवले. हो, तो जितका चांगला खेळायचा तसा काहीसा खेळू शकला नाही आणि त्याने स्वतःवर खूप दबाव आणला. पण मला तो मुलगा खूप आवडला कारण तो अतिशय प्रामाणिक होता, मनापासून सुधारायचे, प्रगती करायची त्याची इच्छा होती. पण एका टप्प्यावर तो पुढे कसा जायचे हेच त्याला समजेनासे झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---