आयपीएलचा 12 वा मोसम जवळजवळ एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. 23 मार्चपासून यावर्षीच्या आयपीएल मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमाचे पहिल्या दोन आठवड्यातील सामन्यांचे वेळापत्रकही काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले आहे.
यावर्षी गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सलामीचा सामना रंगणार आहे. मात्र यावर्षी सालाबादप्रमाणे आयपीएलचा उद्घाटन सोहळा रंगणार नाही. हा सोहळा दरवर्षी आयपीएलचा मोसमातील पहिल्या सामन्याआधी पार पडत होता.
पण यावर्षी उद्घाटन सोहळ्यासाठी खर्च होणारी रक्कम ही पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबासाठी देणार असल्याचे बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले आहे. त्याचमुळे यावर्षी हा उद्घाटन सोहळा पार पडणार नाही.
याबद्दल राय म्हणाले, ‘यावर्षी नेहमीप्रमाणे आयपीएलमध्ये उद्घाटन सोहळा होणार नाही. या सोहळ्यासाठीची असलेली रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबासाठी दिली जाईल.’
महत्त्वाच्या बातम्या-
–पहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ
–विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी तब्बल ४ लाख अर्ज
–सिक्सर किंग ख्रिस गेलने केले विश्वविक्रम, रोहित, आफ्रिदी यांनीही टाकले मागे