---Advertisement---

तीन ऑस्ट्रेलियन दिग्गज निवृत्तीच्या उंबरठ्यावर? पुढील WTC फायनल खेळणे कठीण!

25148_AUS-afp-180108-ashes-cricket_1515390257219
---Advertisement---

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलमध्ये (WTC Final 2025) ऑस्ट्रेलिया संघाला दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना लंडनच्या लॉर्ड्समध्ये खेळला गेला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघावर खूप टीका करण्यात आलेल्या आहेत. या सामन्यात काही अनुभवी खेळाडू अपेक्षेनुसार खरे उतरले नाहीत. आता प्रश्न उपस्थित होत आहेत की, हे खेळाडू पुढच्या डब्ल्यूटीसी फायनल सामन्यात संघाचा भाग असतील की नाही?

दिग्गज ओपनर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) या मोठ्या सामन्यात अजिबात प्रभावी कामगिरी करू शकला नाही. तो दोन्ही डावात फेल ठरला. त्याचे न खेळणे संघाच्या पराभवाचे कारण ठरले. त्याचे वय आता 38 वर्ष आहे आणि पुढच्या डब्ल्यूटीसी फायनलपर्यंत तो 40 वर्षाचा होईल. त्यामुळे त्याचा फॉर्म आणि फिटनेस बघता त्याच खेळण अवघड असणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नाथन लायन (Nathan layan) सुद्धा या सामन्यात म्हणावी तशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही. लॉर्ड्सच्या मैदानावर तो त्याची कामगिरी सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे भविष्यात ऑस्ट्रेलिया संघ नवीन फिरकी गोलंदाजांना संधी देण्याची शक्यता आहे.

स्टीव स्मिथ (Steve Smith) जो कधी ऑस्ट्रेलिया संघाच्या भक्कम फलंदाजीचा कणा मानला जायचा, तो सुद्धा त्याच्या खराब फॉर्म मधून जाताना दिसला. तो WTC फायनलमध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया येणाऱ्या काळात नवीन फलंदाजांना संधी देण्याचा विचार करेल. जर स्मिथ त्याच्या फॉर्ममध्ये परत आला नाही तर पुढचा WTC फायनल त्याच्यासाठी शेवटची संधी ठरू शकते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---