आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली. आत्तापर्यंत या स्पर्धेचे १२ हंगाम खेळेल गेले आणि १९ सप्टेंबर २०२० रोजी युएई मध्ये १३ वा हंगाम खेळाला जाईल. दरवर्षी आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंसोबतच काही परदेशी खेळाडू देखील सहभागी होत असतात. यातील अनेक खेळाडू आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहेत. यात काही मोजक्या परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.
या लेखात अशाच ३ परदेशी खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे आयपीएलच्या पहिल्या वर्षापासून या टी-२० स्पर्धेमध्ये सातत्याने खेळत आहेत.
शेन वॉटसन (Shane Watson)
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. त्याच सध्या वय ३९ वर्ष आहे. परंतु अजूनही तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळण्यास सुरुवात केली. नंतर तो आरसीबीकडूनही खेळला आहे. सध्या तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य आहे.
आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १३४ सामने खेळले आहेत. या मोसमात तो चेन्नई सुपर किंग्जसाठी महत्वाचा खेळाडू म्हणून सिद्ध होऊ शकतो. तो त्याच्या फलंदाजी सोबतच गोलंदाजी मधूनही संघाला महत्वाचे योगदान देत असतो.
एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers)
एबी डिव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. तो २००८ पासून आयपीएल स्पर्धा खेळत आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या १५४ सामन्यांत ३९.९५ च्या उत्तम सरासरीने एकूण त्याने ४३९५ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ३३ अर्धशतके तर ३ शतकी खेळ्या साकारल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये एकूण २१२ षटकार ठोकले आहेत. ख्रिस गेलनंतर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा तो दुसरा फलंदाज आहे.
तो २००८ मधील पहिले आयपीएल सत्र दिल्ली डेअरडेविल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळाला आणि ३ वर्ष दिल्ली संघाकडून खेळात राहिला. नंतर तो आरसीबीमध्ये सामील झाला आणि आतापर्यंत तो आरसीबीकडूनच खेळत आहे. या हंगामात आरसीबी संघाला या स्टार खेळाडूंकडून बर्याच अपेक्षा असतील.
डेल स्टेन (Dale Steyn)
डेल स्टेन या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला आयपीएल २०२० च्या लिलावातील पहिल्या फेरीत कोणी विकत घेतले नाही, परंतु दुसऱ्या लिलावाच्या फेरीत त्याला आरसीबीच्या संघाने २ कोटीमध्ये विकत घेतले.
तो गेल्या मोसमातही आरसीबीकडूनच खेळला होता, पण स्पर्धेत झालेल्या दुखापतीमुळे तो पुढे खेळू शकला नाही. यानंतर त्याला आरसीबीने सोडले, परंतु पुन्हा एकदा आरसीबीनेच त्याला लिलावातून विकत घेतले.
त्याने आयपीएलमध्ये ९२ सामन्यात ९६ बळी घेतले आहेत. डेल स्टेन पहिल्या सत्रापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. विशेष म्हणजे त्याने २००८च्या हंगामात आरसीबीकडून सुरुवात केली. परंतु नंतर तो सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स, हैदराबाद सनरायझर्स आणि गुजरात लायन्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे.