आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाकडून खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणे इतके सोपे नसते. तेही भारतासारख्या प्रतिभाशाली देशात तर क्रिकेट संघात जागा मिळवणे फारच अवघड जाते. भारतात क्रिकेटचे खूप जास्त क्रेझ आहे. येथे सचिन तेंडुलकरला त्याच्या शानदार खेळामुळे ‘गॉड ऑफ क्रिकेट’ ही उपाधी देण्यात आली आहे. त्यावेळी 2007 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर समर्थकांकडूनही त्याच्यावर टीका केली गेली आणि बऱ्याचशा खेळाडूंचे पोस्टर्सही जाळण्यात आले. यावरून क्रिकेटबद्दलचे वेड भारतात किती प्रमाणात आहे हे स्पष्टपणे दिसून येते.
भारतीय क्रिकेट संघात गेल्या अनेक वर्षांत अनेक खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पण या प्रत्येक नवीन खेळाडूची कारकीर्द यशस्वी होते असे नाही. बरेचदा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळते. परंतु, त्यानंतर त्यांच्या खराब कामगिरीमुळे त्यांना काही सामन्यांनंतर संघातून बाहेर जाण्याचा मार्ग देखील दर्शविला जातो. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये प्रचंड स्पर्धा असतात. या कारणास्तव, खेळाडूंना निवडलेल्या प्रसंगीच स्वत:ला सिद्ध करावे लागते.
याच विषयाला संबोधून, आपण येथे अशा तीन खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे आता भारतीय संघात पुनरागमन होणे जवळपास अशक्य आहे.
3. परवेज रसूल-
जम्मू-काश्मीरचा अष्टपैलू परवेज रसूल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून खेळलेला पहिला खेळाडू आहे. घरगुती क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे रसूलची 2013 मध्ये झिम्बाब्वे दौर्यासाठी निवड झाली होती. मात्र, तेथे पदार्पण करण्याची संधी त्याला मिळाली नाही. काही काळानंतर बांगलादेश दौर्यावर त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याच्या डेपदाक्ब्यूरणाच्या एकदिवसीय सामन्यात त्याने दोन विकेट मिळवल्या होत्या.
मात्र, यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये त्याची निवड झाली आणि पदार्पण करण्याची संधीही मिळाली. या सामन्यात त्याने एक विकेट घेतली आणि 5 धावा केल्या. त्यानंतर रसूलला संघात संधी देण्यात आली नाही. आता आयपीएलमध्येही त्याला कोणताही खरेदीदार मिळत नाही. अशा परिस्थितीत नवीन खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर रसूलने संघात पुनरागमन करणे जवळजवळ अवघड आहे.
2. राहूल शर्मा –
उंच लेग स्पिनर राहुल शर्माने आयपीएल 2011 मध्ये केलेल्या शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. लवकरच त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे भारतीय संघामध्ये त्याचा समावेश झाला. मात्र, इंग्लंडविरुद्ध निवड होऊनही त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. यानंतर 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत.
याव्यतिरिक्त 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण करणाऱ्या राहुलने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त दोन टी-20 खेळले आहेत. राहुल शर्मा बऱ्याच काळापासून आयपीएलमध्ये दिसला नाही. देशांतर्गत स्तरावर त्याची कामगिरी फारशी झाली नाही. सध्या युझवेंद्र चहल आणि राहुल चाहर संघाचे प्रमुख लेगस्पिनर बनले आहेत. या कारणास्तव, आता या खेळाडूचे संघात परत येणे अशक्य आहे.
1. वरून आरोन –
वरुण आरोनने भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही सामने खेळले आहेत. परंतु, तो गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आणि त्याच कारणास्तव त्याला संघातून वगळण्यात आले. या खेळाडूकडे वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता होती. परंतु, त्याच्या गोलंदाजीवर नियंत्रण नव्हते. त्याची हीच उणीव त्याला खूप महागात पडली.
वरुणने भारताकडून 9 कसोटी सामन्यांत 18 विकेट घेतल्या आहेत आणि 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 विकेट देखील घेतल्या आहेत. वरून आरोनने 2015 मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर तो क्रिकेटमध्ये परतलेला नाही. अलीकडच्या काळात भारताला अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज मिळाले आहेत. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे आरोनचे पुनरागमन करणे आता कठीण झाले आहे.