---Advertisement---

अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण! हे 3 खेळाडू लवकरच घेणार निवृत्ती?

On: गुरूवार, जुलै 30, 2026 7:27 PM
Ajinkya-Rahane-is-likely-to-fill-Injured-Shreyas-Iyers-place-in-the-Test-team
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य राहणेने 30 जुलै 2026 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. (Ajinkya Rahane retires from International cricket) एखाद्या गोष्टीचा असा निरोप घेणे किती कठीण असते, हे राहणेच्या व्हिडिओवरून स्पष्ट झाले. निवृत्तीच्या या व्हिडिओमध्ये त्याचे डोळे पाणावले होते. राहणेने आपल्या 195 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 8414 धावा केल्या.

राहणेने 31 ऑगस्ट 2011 रोजी इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर, विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्याने टीम इंडियाला अनेक जोरदार विजय मिळवून दिले. मात्र, भारतीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू देखील आहेत, जे राहणेच्या पाऊलावर पाऊल ठेवून याच वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.

मोहम्मद शमी
निवृत्ती घेणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सच्या यादीत पुढचे नाव मोहम्मद शमीचे (Mohmmed Shami) असू शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करूनही टीम इंडियात त्याचे पुनरागमन झालेले नाही, यावरून निवडकर्त्यांनी त्याला 2027 च्या विश्वचषक (वर्ल्ड कप) योजनेतून वगळल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तसेच, शमी कसोटी आणि टी-20 संघातूनही बाहेर आहे. आता त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता अगदीच कमी आहे.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) नेतृत्वाखाली भारताने 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर अचानक निवड समितीने त्याला टीम इंडियातून वगळलं. याचबरोबर सूर्यकुमार केवळ टी-20 फॉरमॅटमध्येच सक्रिय होता. कसोटी आणि वनडे संघात त्याच्या पुनरागमनाची आता शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे तो देखील लवकरच आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला निरोप देऊ शकतो.

युजवेंद्र चहल

फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yujvendra Chahal) 2023 नंतर टीम इंडियात परतलेला नाही. यावरून हे स्पष्ट होते की, चहल आगामी वनडे आणि टी-20 विश्वचषकाच्या योजनांमध्येही समाविष्ट नाही. सध्या चहलचे वय 36 वर्षे आहे आणि पुढचा विश्वचषक संपेपर्यंत त्याची गणना सर्वात वयस्कर खेळाडूंमध्ये होऊ लागेल. त्यामुळे या खेळाडूंची निवृत्ती घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---