---Advertisement---

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत हे 3 भारतीय खेळाडू पाहत राहिले संधीची वाट, गंभीरने दिली नाही संघात संधी!

On: गुरूवार, जुलै 31, 2025 5:44 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ काही बदलांसह मैदानात उतरला आहे. मात्र या दौऱ्यात असे 3 खेळाडू आहेत, ज्यांना संपूर्ण मालिकेत एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही.

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा (Anderson Tendulkar Trophy) शेवटचा सामना सुरू आहे. या मालिकेत भारताकडून अनेक खेळाडूंना संधी मिळाली. अंशुल कंबोजला (Anshul Kamboj) तर याच मालिकेद्वारे भारताकडून कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. पण अर्शदीप सिंग (Arshdeep singh), कुलदीप यादव (Kuldeep yadav) आणि अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) या तिघांना एकही सामना खेळता आला नाही. अनेक माजी खेळाडूंनी या तिघांना अंतिम अकरामध्ये सामील करावं अशी मागणी केली होती. मात्र संघ व्यवस्थापनाने कोणाचंही ऐकलं नाही.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत (BGT) दुर्लक्षित झालेल्या अभिमन्यू ईश्वरनला इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्यालाही एकदाही संघात घेतलं गेलं नाही. ईश्वरन सातत्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत आहे. पण तरीही भारताकडून डेब्यू करण्यासाठी त्याला आणखी थांबावं लागणार आहे. त्याचे घरगुती क्रिकेटमधील आकडे वाखाणण्याजोगे आहेत. 103 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने 48.70 च्या सरासरीने 7841 धावा केल्या आहेत, ज्यात 27 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, अर्शदीप सिंगलाही या मालिकेत भारताकडून कसोटी पदार्पणाची वाट पाहतच राहावं लागलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---