---Advertisement---

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असा’ अद्भुत विक्रम, तिन्ही स्वरुपात ३ खेळाडूंचे षटकारासह पदार्पण

On: सोमवार, जुलै 19, 2021 8:48 AM
---Advertisement---

कोलंबो| श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील बहुप्रतिक्षित मर्यादित षटकांच्या मालिकेला वनडे सामन्याने सुरुवात झाली आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी (१८ जुलै) पार पडेलल्या पहिल्या वनडे सामन्यात पाहुण्या भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यातून यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याने वनडे पदार्पण करत मोठा प्रताप केला आहे.

खणखणीत षटाकारासह त्याने वनडे कारकिर्दीची अविस्मरणीय सुरुवात केली आहे. यासह भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवा आणि प्रशंसनीय विक्रम नोंदला गेला आहे.

श्रीलंकेचा फिरकीपटू चरिथ असलांकाच्या चेंडूवर (१२.५ षटक) पुढे सरसावत इशानने शानदार षटकार खेचला होता. अशाप्रकारे वनडे कारकिर्दीतील पहिलीच धाव त्याने षटकार मारत घेतली. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात पदार्पणातील पहिली धाव षटकाराच्या रुपात घेण्याचा अनोखा आणि अद्भुत विक्रम भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला गेला आहे.

वनडे स्वरुपात इशानने हा पराक्रम केला आहे. त्याच्यापुर्वी टी२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवने हा कारनामा केला होता; तर कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने हा किर्तीमान केला होता. सूर्यकुमारने मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर टी२० पदार्पण केले होते. या सामन्यात जोफ्रा आर्चरविरुद्ध षटकार खेचत त्याने पहिली धाव घेतली होती. पंतने २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणात आदिल राशिदच्या चेंडूवर षटकार ठोकला होता.

भारताव्यतिरिक्त इतर कोणत्या संघाच्या क्रिकेटपटूंनी कदाचितच हा विक्रम केला असावा.

इशान किशनपुर्वी केवळ ४ क्रिकेटपटूंना जमलय हे काम
इशानपुर्वी वनडे कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याची किमया केवळ चार खेळाडूंना करता आली होती. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान लू याने २००८ मध्ये, पाकिस्तानच्या जवाद दाऊदने २०१० मध्ये, स्कॉटलंडच्या क्रेग वॉलसने २०१६ तर, झिम्बाब्वेच्या रिचर्ड नगवाराने २०१७ मध्ये ही किमया केली होती. त्यानंतर आता अशी कामगिरी करणारा इशान पाचवा फलंदाज बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘द्राविड उत्कल वंग’; राष्ट्रगीतातील हे बोल सुरू होताच द्रविडकडे फिरला कॅमेरा, भारतीयांची अभिमानाने फुगली छाती

नाबाद अर्धशतकासह ‘गब्बर’ बनला दस हजारी मनसबदार; दिग्गज सलामीवीरांच्या यादीत मिळवले मानाचे स्थान

श्रीलंकेविरुद्ध पृथ्वी शॉमध्ये दिसली ‘विरु’ची झलक; ताबडतोड फलंदाजीसह सेहवागच्या विक्रमाची केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---