---Advertisement---

‘हे’ ३ विदेशी खेळाडू आयपीएलच्या कोणत्याही संघासाठी ठरतील हुकुमी एक्के, ज्यांना मिळायला हवी एक संधी

On: शुक्रवार, सप्टेंबर 3, 2021 12:56 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही अशी क्रिकेट स्पर्धा आहे, जी जगभरात अत्यंत लोकप्रिय आहे. जगातील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळण्यास इच्छुक असतात. यासाठी दरवर्षी आयपीएलपूर्वी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होत असते. यामध्ये अनेक विदेशी दिग्गज खेळाडू चांगल्या बोलीसह संघात सामील होतात, तर असेही काय खेळाडू असतात ज्यांच्यावर बोली लावण्यात संघ रस घेत नाहीत. याला अनेक कारणे असू शकतात. यामुळे यात असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे कौशल्य तर आहेत. मात्र या स्पर्धेत खेळू शकत नाही. असेही काही विदेशी खेळाडू आहेत, जे एकदा तरी आयपीएलचा भाग असावेत, असे अनेक चाहत्यांना वाटते. आज आपण त्याच ३ खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएलमध्ये खेळले पाहिजे

रस्सी वॅन डर डुसेन –
दक्षिण आफ्रिकेचा हा दिग्गज खेळाडू या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. हा खेळाडू टी-२० मधील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. हा दक्षिण आफ्रिका संघातील एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. अनेक वेळा आपल्या दमदार खेळीने दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

डुसेनने दक्षिण आफ्रिकासाठी एकूण २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ३६ च्या सरासरीने त्याने ७५६ धावा केल्या आहेत. ज्यात त्याचा स्ट्राईक रेट १३४.७६ एवढा आहे. त्यामुळे हा धडाकेबाज खेळाडू आयपीएलचा भाग असावा, असे सर्वांनाच वाटेल.

ब्रँडन किंग –
ब्रँडन हा वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज आहे. टी-२० प्रकारात त्याने अत्यंत उत्कृष्ट खेळी केली आहे. २०१९ च्या कॅरिबियन प्रीमियर लीग मधील तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. यानंतर त्याने वेस्टइंडीज संघाकडून देखील टी-२० सामन्यात पदार्पण केले होते.

वेस्टइंडीज आणि भारत यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत त्याने आपल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर सगळ्यांना प्रभावित केले होते. ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ब्रँडन किंगने १३४ च्या स्ट्राईक रेटने दमदार खेळी केली आहे. अशात तो आयपीएलमध्ये कोणत्याही संघाकडून एक फिनिशर म्हणून चांगली भूमिका निभावू शकतो.

नॅथन लायन –
ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज टी-२० मध्ये चांगली खेळी करू शकतो. लायनला टी-२० मध्ये जास्त संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलिया संघाने देखील त्याला टी-२० सामन्यांमध्ये जास्त संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियाकडून त्याने केवळ २ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

असे असले तरी, लायन टी-२० सामान्यांसाठी गोलंदाज म्हणून चांगला पर्याय ठरू शकतो. याची प्रचीती ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमधून दिसून येते. या स्पर्धेत लायनने ३३ सामन्यात ४१ विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ६.९८ एवढा आहे. टी-२० च्या दृष्टिकोनाने हा इकॉनॉमी रेट अत्यंत चांगला मानला जातो. तसेच एकदा त्याने ५ विकेट्स घेण्याचा देखील कारनामा केला होता. यावरून समजून येते की, तो टी-२० सामन्यात एक चांगला गोलंदाज म्हणून ठरवू शकतो.

महत्वाच्या बातम्या –
‘विराट एकवेळ जार्वोला संधी देईल, पण अश्विनला नव्हे’, ओव्हल कसोटीसाठीच्या संघनिवडीवर चाहते भडकले
ओव्हलचे मैदान दमदार फलंदाजीने गाजवणारे ३ भारतीय फलंदाज, शास्त्रींचाही समावेश
चौथा कसोटी सामना ओव्हलवर, पाहा काय सांगतो या मैदानावरील नाणेफेकीचा इतिहास

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---