चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलमधील दुसरा सर्वाधिक यशस्वी संघ आहे. चेन्नईने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यासोबतच, दरवर्षी हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. स्टीफन फ्लेमिंगच्या मार्गदर्शनात व एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा संघ दरवर्षी शानदार कामगिरी करत असलेला आपण पाहतो.
सीएसकेसाठी आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाज खेळले आहेत. स्टीफन फ्लेमिंग, माईक हसी, मॅथ्यू हेडन यांनी सुरुवातीची काही वर्षे फलंदाजीची जबाबदारी पार पाडली. नंतरच्या काळात, ब्रेंडन मॅक्युलम, ड्वेन स्मिथ, फाफ डू प्लेसिस हे आंतरराष्ट्रीय फलंदाज संघात होते. काही खेळाडू तर पहिल्या हंगामापासून चेन्नईच्या संघात आहेत.
पहिल्यापासूनच संघात आक्रमक फलंदाज असल्याने चेन्नईने चौकार षटकारांच्या राशी लावलेल्या आहेत. आज आपण अशाच, तीन फलंदाजांविषयी जाणून घेऊया, ज्यांनी सीएसकेसाठी सर्वाधिक षटकार खेचले आहेत.
३) मुरली विजय – ६८ षटकार
सीएसकेच्या इतिहासातील सर्वात्तम सलामीवीर असलेल्या मुरली विजयने २००९-२०१९ या काळात सीएसकेसाठी ६७ सामने खेळताना ६८ षटकार मारले आहेत.
२००९ ते २०१३ या काळात तो चेन्नईसाठी सर्वाधिक यशस्वी झाला. त्यानंतर त्याने किंग्स इलेव्हन पंजाब व दिल्ली डेअरडेविल्स संघांचे प्रतिनिधित्व देखील केले. २०१८ मध्ये तो पुन्हा चेन्नईमध्ये परतला. नव्याने संघात सामील झालेल्या अंबाती रायडू व शेन वॉटसन यांच्यामुळे त्याला अंतिम अकरामध्ये जास्त संधी मिळत नाही.
पण मुरली विजयने आतापर्यंत, सीएसकेसाठी ६७ सामने खेळताना १२६.५० च्या स्ट्राइक रेटने १,६७६ धावा बनविल्या आहेत. यात १२८ धावांची सर्वाच्च खेळी देखील सामील आहे.
२) सुरेश रैना – १७१ षटकार
सुरेश रैना पहिल्या हंगामापासून चेन्नईच्या संघाचा अविभाज्य घटक आहे. रैना शिवाय सीएसकेच्या संघाची कल्पनाही केली जात नाही. ‘ चिन्ना थाला ‘ नावाने प्रसिद्ध असलेला रैना चेन्नई संघाचा आधारस्तंभ व उपकर्णधार आहे.
रैनाने आतापर्यंत चेन्नईसाठी १६४ सामने खेळताना सर्वाधिक ४,५२७ धावा काढल्या आहेत. यादरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट १३७.२० असा राहिला आहे. रैनाने चेन्नईसाठी १७१ षटकार खेचत, या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.
१) एमएस धोनी – १७९ षटकार
पहिल्या आयपीएल हंगामापासून चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणारा एमएस धोनी या यादीत अव्वल स्थानावर आहे. चेन्नईला कर्णधार म्हणून तीन विजेतेपदे मिळवून देणाऱ्या, धोनीने सीएसकेसाठी १६० आयपीएल सामने खेळताना १७९ गगनचुंबी षटकार ठोकले आहेत.
धोनीने चेन्नईसाठी १४०.०३ च्या स्ट्राईक रेटने ३,८५८ धावा काढल्या आहेत. आगामी आयपीएलमध्ये चेन्नईसाठी ४,००० आयपीएल धावा बनविण्याची संधी त्याच्याकडे असेल.
ट्रेंडिंग लेख –
भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास
डावखुऱ्या भारतीय खेळाडूंची ड्रीम ११; पहा कोण आहे यष्टीरक्षक
असे ५ क्रिकेटर, जे आहेत डावखुरे फलंदाज परंतु करतात उजव्या हाताने गोलंदाजी
महत्त्वाच्या बातम्या –
किंग्ज ११ पंजाबचा त्रिशतकवीर खेळाडू कोरोनातून बरा, खेळणार आयपीएल २०२०
‘खेळाडूंनो सोशल मीडियापासून दूर राहा,’ पाहा कोण म्हणतंय
विक्रम तर अनेक होतील, पण युसूफ-इरफानचा ‘हा’ विक्रम मोडणे केवळ कठीण