सद्यस्थितीला भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये जगातील उत्कृष्ट संघांपैकी एक आहे. एका खेळाडूला तिन्ही प्रकाराच्या संघात स्थान मिळवणे अवघड असते. असे अनेक भारतीय खेळाडू आहेत यांचे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील प्रदर्शन चांगले आहे, पण आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्यांना त्यांची छाप सोडता आली नाही. त्यामुळे त्यांना भारताकडून गेल्या काही वर्षापासून टी20 क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. या लेखात अशात 4 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, जे लवकरच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.
अजिंक्य रहाणे: भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे आंतरराष्ट्रीय टी20 मधील प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. रहाणेने भारतासाठी त्याचा शेवटचा टी20 सामना 2016 साली खेळला होता. तरी, राहणेचे आयपीएलमधील प्रदर्शन चांगलं राहिले आहे. त्याने 151 सामन्यातील 141 डावामध्ये 3941 धावा केल्या आहेत. पण तो आंतरराष्ट्रीय स्तरावर तशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
उमेश यादव: वेगवान गोलंदाज उमेश यादव याने भारतासाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याचे आकडे समाधानकारक नाहीत. 2012 मध्ये पदार्पण करणाऱ्या उमेशने केवळ 7 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून त्यात त्याने 9 विकेट्स मिळवल्या आहेत. आयपीएलमध्ये उमेशच्या नावे 119 विकेट्स आहेत. या स्पर्धेत 100 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स मिळवलेल्यांच्या यादीत उमेश दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याची ही कामगिरी पाहाता, त्याला लवकरच टी20 मधून निवृत्ती घ्यावी लागू शकते.
रॉबिन उथप्पा: साल 2007 मध्ये टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघात राहिलेला रॉबिन उथप्पाही यादीत आहेत. 2007 मध्ये पदार्पण करणाऱ्या उथप्पाने भारतासाठी 13 टी-20 सामन्यात 24.90 च्या सरासरीने 249 धावा बनवलेल्या आहेत. ज्यात त्याने केवळ एक अर्धशतक आहे. उथप्पा =ने भारतासाठी शेवटचा टी-20 सामना 2015 मध्ये खेळला होता. पण आयपीएलमध्ये उथप्पाचे प्रदर्शन चांगले आहे. त्याने 189 सामन्यांत 4607 धावा केल्या आहेत. ज्यात 24 अर्धशतके सामील आहेत. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळत नसल्याने तो आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेऊ शकतो.
ईशांत शर्मा: भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा 2013 नंतर एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला नाही. 2008 मध्ये पदार्पण केलेल्या ईशानने भारतासाठी 14 टी-20 सामने खेळले असून त्यात फक्त 8 विकेट्स मिळवल्या आहेत. आयपीएलमधील त्याने खेळलेल्या 93 सामन्यांमध्ये त्याने 73 विकेट्स मिळवल्या आहेत. त्याची ही कामगिरी पाहाता आणि तंदुरुस्तीचा विचार करता, तो देखील टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
‘राहुल चाहर मला राशिद खानची आठवण करून देत आहे’, पाहा कोणी केलीये तुलना
“भारताच्या विकेट पडत होत्या, माझी मुले मला शिव्या देत होती” टी२० मालिकेतील पराभवावर भडकला सेहवाग
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ संघ होणार विजयी, इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे भाकीत