---Advertisement---

असे ४ दिग्गज ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नसती तर आजही दिसले असते राष्ट्रीय संघात

On: गुरूवार, जून 10, 2021 4:04 PM
---Advertisement---

प्रत्येक खेळाडूंच्या जीवनात अशी एक वेळ येते जिथे यांना त्यांच्या कारकिर्दीला पूर्णविराम द्यावा लागतो. लहानपणापासून खेळाडूंनी आपल्या खेळसाठी सर्वस्व दिलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीतूचा निरोप घेणे खूप कठीण असतं. परंतु, प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात हा दिवस येतो. खेळातून निवृत्ती घेण्यामागे खेळाडूंची अनेक कारणे असतात.

सध्या असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण ते लीग स्पर्धांमध्ये खेळत आहेत. तसेच त्यांचा अजूनही फॉर्म चांगला आहे. त्यांच्याकडे पाहून अनेकांना असे वाटते की त्यांनी अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे सर्वस्व दिले असते. अशाच चार खेळाडूंबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

1) थिसारा परेरा
श्रीलंकेचा खेळाडू थिसारा परेरानी वयाच्या 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही दिवसांपूर्वी निवृत्ती घेतला. त्यानी हा निर्णय येत्या आयसीसी स्पर्धांमध्ये युवा खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळावे म्हणून घेतला होता. परंतु सध्या श्रीलंका संघाची परिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे परेराला राष्ट्रीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळू शकली असती. परेरानी एकदिवसीय सामन्यात आणि टी20 स्तरावर 3000 पेक्षाही जास्ती धावा झलकवल्या आहेत. इतकेच नव्हे तर परेरा उत्कृष्ट गोलंदाजी करतो. त्यानी 226 बळी घेतले आहेत.

2) हाशिम अमला
दक्षिण आफ्रिका संघातील उत्कृष्ट फलंदाज हाशिम अमलाला ओळखले जाते. हाशिम आमला हा उत्कृष्ट शॉर्ट खेळायचा. उत्कृष्ट फलंदाजी करत असतानाही त्याने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतला. परंतु त्यानी काउंटी क्रिकेट खेळणे सुरू ठेवले. त्यानी या हंगामात काउंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळताना 8 सामन्यात 57.70 च्या सरासरीने 577 धावा बनवल्या. ज्यामध्ये दोन शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. सध्याचा दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये असा कोणताच खेळाडू नाही जो दिग्गज खेळाडू हाशिम आमलाची जागा घेऊ शकेल.

3) मोहम्मद आमिर
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर हा असे खेळाडू आहे, ज्यानी वयाच्या 28 वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतला. त्याचा हा निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. प्रशिक्षक स्टाफ आणि मॅनेजमेंट यांच्यातील मतभेदांमुळे मोहम्मद आमिरला हा निर्णय घ्यावा लागला. मोहम्मद आमिरने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्या संघासाठी अनेक वेळा चांगली कामगिरी केलेली आहे. येत्या टी20 विश्वचषकाचा विचार करता मोहम्मद आमीर यांसारखे खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. बाबर अझम आणि अन्य खेळाडूंनी त्याची खूप समजूत घातली की त्यानी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. परंतु त्यानी त्याचा निर्णय बदलला नाही

4) एबी डिव्हिलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सनी 2018 मध्ये अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पण त्याने जगभरातील टी20 लीगमध्ये खेळणे सुरु ठेवले. असे असतानाच 2019 च्या विश्वचषकानंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दल चर्चा सुरु झाले. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याने स्पष्ट केले की 2018 ला घेतलेला निवृत्तीचा निर्णय अंतिम होता. पण या दिग्गज फलंदाजाने वेगवेगळ्या टी20 स्पर्धेमध्ये खेळताना आंतरराष्ट्रीय गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या आणि संपूर्ण जगाला दाखवून दिले की तो आणखीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळू शकला असता.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनी की विराट कोण आहे सर्वोत्तम कर्णधार? इंग्लंडच्या दिग्गजाने दिले ‘हे’ उत्तर

दीपक चाहरच्या ‘गजनी’ लूकने माहीच्या पत्नीलाही लावलं याड; म्हणाली, ‘एकदम खरतनाक’

अथक प्रयत्नांना अखेर यश! १३ आयपीएल अर्धशतके करणाऱ्या धुरंधराचे भारतीय संघात होणार पदार्पण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---