झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता आशिया चषक २०२२ जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघाने यापूर्वी आशिया चषकाच्या ७ ट्रॉफी जिंकल्या आहेत. श्रीलंका संघाने पाच वेळा, तर पाकिस्तान संघाने फक्त २ वेळा हे विजेतपद पटकावले आहे. आज आपण या लेखात अशा पाच कर्णधारांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी आशिया चषकात सर्वात जास्त सामने जिंकले आहेत. या यादीत भारतीय संघाचा एक दिग्गज कर्णधार सहभागी आहे.
एमएस धोनी –
भारतीय संघाच्या इतिहासतील सर्वोत्तम कर्णधार म्हणून एमएस धोनी (MS Dhoni) याला ओळखला जाते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१० आणि २०१६ सालचा आशिया चषक जिंकला होता. त्याने या स्पर्धेत एकूण १९ सामन्या संघाची कमान सांभाळली आणि १४ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला.
अर्जुन रणतुंगा –
श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा (Arjun Ranatunga) आशिया चषकात दुसरा सर्वात जास्त सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने आशिया चषकातील १३ सामन्यांमध्ये श्रीलंकन संघाचे नेतृत्व केले आणि त्यापैकी ९ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला.
मश्रफी मोर्तझा –
बांगलादेश संघाने अद्याप एकदा देखील आशिया चषक जिंकला नाहीये, पण या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ते नक्कीच पोहोचले आहेत. त्यांचा दिग्गज कर्णधार मश्रफी मोर्तझा (Mashrafe Mortaza) याने आशिया चषकाच्या ११ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी ६ सामन्यांमध्ये बांगलादेश संघाला विजय मिळाला.
माहिला जयवर्धने –
माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) त्याच्या तुफानी खेळीसाठी ओळखला जातो. त्याने श्रीलंकन संघासाठी आशिया चषकाच्या १० सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली आणि यापैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला.
मिस्बाह उल हक –
मिस्बाह उल हक (Misbah-ul-Haq) याची गणना पाकिस्तान संघाच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने स्वतःच्या जोरावर संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. मिस्बाहने त्याच्या कारकिर्दीत आशिया चषकातील एकूण १० सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आणि यापैकी ७ सामन्यात संघाला विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
यंदा टी२० स्वरूपात का खेळला जातोय आशिया चषक? जाणून घ्या त्यामागचे कारण
‘मी आश्चर्यचकित झालो आहे’, विराटच्या फलंदाजीवर राशिद खानची भन्नाट प्रतिक्रिया
‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटची थेट पाकिस्तानच्या फलंदाजी प्रशिक्षकाकडेच धाव, घेतल्या टिप्स