प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की त्याने त्याच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करावे. त्यासाठी खेळाडू आपले दिवस-रात्र एक करत असतात. जेव्हा त्यांना देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळते, तेव्हा काही खेळाडू त्या संधीचा लाभ घेतात; तर काहींना त्या संधीचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे प्रतिभा असूनही एका सामन्यात खराब प्रदर्शन केल्याने त्यांना संघातून वगळण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे पुनरागमन करणे अशक्य होऊन जाते.
आज आपण अशा ५ खेळाडूंबद्दल बोलणार आहोत, ज्यांना भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळाली. पण त्यांना या संधीचा लाभ नाही घेता आला व ते भारतीय संघातून कायमचे बाहेर झाल्यासारखे आहेत.
५. परवेज रसूल
परवेज रसूल हा भारतासाठी खेळणारा जम्मू काश्मीरचा प्रथम खेळाडू होय. परवेज रसूलने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध भारतासाठी वनडेमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने २ विकेट घेतल्या होत्या. तरीही त्याला पुढील वनडे सामना खेळण्यासाठी संधी दिली गेली नाही. २०१७ मध्ये इंग्लंड विरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. पण त्याला त्या संधीचे सोने करता नाही आले व तो सामना त्याचा अंतिम सामना ठरला
४. श्रीनाथ अरविंद
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून अप्रतिम असे प्रदर्शन केल्यानंतर श्रीनाथ अरविंदला २०१५ मध्ये भारताकडून पदार्पण करण्यासाठी संधी दिली गेली होती. त्याने दक्षिण अफ्रिकाविरुद्ध धर्मशाळामध्ये आपला पहिला टी-२० सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने २२ चेंडू गोलंदाजी करताना ४४ धावा दिल्या होत्या आणि अवघी १ विकेट घेतली होती. त्यानंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन झालेच नाही.
३. ऋषी धवन
घरगुती क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेश आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून उत्कृष्ठ असे प्रदर्शन केल्यानंतर ऋषी धवनला २०१६ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले होते. त्याला तिथे ३ सामन्यात खेळवण्यात आले. पण त्या सामन्यांमध्ये त्याला उत्कृष्ट प्रदर्शन करता आले नाही. त्याने ३ सामन्यात फक्त १२ धावा आणि १ विकेटची कामगिरी केली होती. त्याचवर्षी त्याला झिम्बावेविरुद्ध टी-२० मध्ये पदार्पण करण्याची संधी दिली गेली. परंतु त्यानंतर तो परत भारतीय संघात कधीच खेळताना दिसला नाही.
२. संदीप शर्मा
आयपीएलमध्ये आपल्या धारदार स्विंग गोलंदाजीने प्रभावित केलेल्या या खेळाडूला २०१५ मध्ये झिम्बावेविरुद्ध खेळण्याची संधी देण्यात आली होती. पण त्या मालिकेत संदीपने १० पेक्ष्या अधिक इकोनॉमीने धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी नाही देण्यात आली.
१. पवन नेगी
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून गोलंदाजी आणि फलंदाजीत पवन नेगीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. घरगुती क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केल्यानंतर पवन नेगीला २०१६ च्या आशिया विश्वचषकात यूएईविरुद्ध संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी देण्यात आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
कधी आनंदात तर कधी दु:खात! असे ५ प्रसंग, जेव्हा खेळाडूंना भर मैदानातच कोसळलं होतं रडू
न्यूझीलंडच्या पदार्पणवीराने घडवला इतिहास, तब्बल १२५ वर्षांपुर्वीचा विक्रम काढला मोडीत
ग्रेट भेट! खूप दिवसानंतर ‘या’ दोन भारतीय खेळाडूंची झाली भेट, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद