कोणत्याही खेळाडूचे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण या सर्व विभागातील शानदार प्रदर्शन संघासाठी फायद्याचे ठरत असते. २० षटकांच्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही कित्येक भारतीय आणि परदेशी खेळाडू त्यांच्या जबरदस्त प्रदर्शननाने सर्वांची मने जिंकत असतात. काही खेळाडु पूर्ण हंगामात सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसतात. तर काहींच्या प्रदर्शनात चढ-उतार पाहायला मिळतात. आयपीएलच्या १३व्या हंगामात तर पूर्ण हंगामात काही खेळाडूंचा त्यांची कमाल दाखवता आलेली नाही. त्यामुळे भविष्यात त्यांना याचा परिणाम भोगावा लागू शकतो.
या लेखात आम्ही अशाच पाच खेळाडूंचा आढावा घेतला आहे, ज्यांना कदाचित पुढील हंगामात कोणताही संघ विकत घेऊ इच्छिणार नाही.
या पाच खेळाडूंसाठी नाही लागणार आयपीएल २०२१ मध्ये बोली
केदार जाधव –
चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव या आयपीएल हंगामात सुपर-डुपर फ्लॉप ठरला आहे. त्याने ७ ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध केलेली खेळी कदाचितच कोण विसरु शकेल. या सामन्यात त्याने अंतिम षटकात फलंदाजी करताना १२ चेंडूत केवळ ७ धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नईने १० धावांनी तो सामना गमावला होता.
७.८ कोटींना संघात स्थान मिळालेल्या जाधवने या हंगामातील ८ सामन्यात फक्त ६२ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या २६ इतकी राहिली आहे. त्यामुळे ३५ वर्षीय जाधवसाठी पुढील वर्षी कोणती फ्रंचायझी बोली लावण्याची शक्यता खूपच कमी आहे.
ग्लेन मॅक्सवेल –
किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल २०२० लिलावात अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र हा खेळाडू त्याच्या मोठ्या रक्कमेप्रमाणे मोठी खेळी करण्यात मात्र अपयशी ठरला. त्याला आयपीएलच्या १३व्या हंगामात एकही अर्धशतक लगावता आले नाही. या हंगामात त्याने एकूण १३ सामने खेळले असून फक्त १०८ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी १५.४२ इतकी राहिली आहे. त्यामुळे क्वचितच कोणता संघ २०२१ मध्ये त्याच्यावर विश्वास ठेवेल.
जयदेव उनाडकट –
जयदेव उनाडकटने त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार प्रदर्शनाने आयपीएल फ्रंचायझींचे लक्ष वेधले होते. त्यामुळे या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला राजस्थान रॉयल्सने ३ कोटीची बोली लावत ताफ्यात सहभागी केले होते. परंतु तो राजस्थानसाठी खूप महागडा ठरला. त्याने आयपीएल २०२०मधील ७ सामन्यात केवळ ४ विकेट्स घेतल्या. त्यासाठीही त्याने तब्बल २२८ धावा खर्च केल्या. त्यामुळे राजस्थानने त्याला उर्वरित ७ सामन्यात बाहेर केले. आणि त्याच्याजागी कार्तिक त्यागीला स्थान दिले.
अजिंक्य रहाणे –
युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आर अश्विनसह अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेलाही संघात स्थान दिले होते. परंतु, दिल्लीचे सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या जबरदस्त फॉर्ममुळे त्याला अंतिम ११ जणांच्या पथकात संधी मिळण्यासाठी वाट पाहावी लागली. अखेर पृथ्वी शॉ याच्या खराब फॉर्ममुळे त्याला फक्त ६ सामने खेळायला मिळाले. पण त्यातही त्याने फक्त १११ धावा केल्या. शेवटच्या साखळी सामन्यात रहाणेने डॅमेज कंट्रोल केले आहे. त्यामुळे त्याला संधीची अपेक्षा नक्कीच आहे.
हरभजन सिंग –
चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल २०२०मधून माघार घेतली. तर दूसऱ्या बाजूला तो ४० वर्षांचा झाला आहे. यावर्षी सर्वांनी चेन्नईच्या वयस्कर खेळाडूंच्या प्रदर्शनाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे कोणतीही फ्रंचायझी पुढील हंगामात वयस्कर खेळाडूंना संधी देण्याच्या विचार असू शकत नाही. म्हणून कदाचित आयपीएल २०२१ लिलावात हरभजन अनसोल्ड राहू शकतो.
ट्रेंडिंग लेख-
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
महत्त्वाच्या बातम्या-
ठरलं तर! ‘या’ दोन संघात होणार आयपीएलचा क्वालिफायर सामना; पाहा काय सांगतोय क्वालिफायरचा इतिहास
‘हिटमॅन’ इझ बॅक! नेट्समध्ये जोरदार फटकेबाजी करत रोहितची निवडकर्त्यांना चपराक, पाहा व्हिडिओ
पाहा कोणते ३ संघ ठरले आयपीएल प्ले ऑफसाठी पात्र? कोणत्या २ संघांना आहे संधी?