---Advertisement---

Good-bye 2021| ४ शतके ते धवनची अष्टपैलू कामगिरी, विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्ये बनले ‘हे’ ६ अद्वितीय विक्रम

On: शुक्रवार, डिसेंबर 31, 2021 11:59 PM
Ruturaj-Gaikwad
---Advertisement---

या हंगामातील विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) चा मानकरी ठरलेला संघ आहे, हिमाचल प्रदेश. या हंगामात प्रथमतः हिमाचल प्रदेश संघाने जेतेपद पटकावले आहे आणि महत्वाचे म्हणजे पाच वेळा विजेत्या तमिळनाडू संघाला पराभूत केले आहे. या विजयासह त्यांनी या हंगामात अनेक विक्रम केले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त बऱ्याचशा संघातील खेळा़डूंनीही विक्रमी कामगिरी केल्या आहेत. त्यांच्या याच विक्रमांचा येथे आढावा घेण्यात आला आहे. (Records Of Vijay Hazare Trophy)

1. हिमाचल प्रदेश संघाने प्रथमच देशांतर्गत क्रिकेटमधील हे पहिले विजेतेपद पटकावले आहे. आणि क्रिकेटच्या 36 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हिमाचल प्रदेश अंतिम सामना खेळला आहे.

2. ऋषी धवन हा हिमाचल प्रदेशचा कर्णधार आहे. त्याने आपल्या नावावर वेगवेगळे विक्रम नोंदवले आहेत. धवन हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने या हंगामात 8 सामन्यात 458 धावा केल्या आणि या हंगामाता सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले. तसेच त्याने गोलंदाजीत 17 विकेट्स घेतल्या असून तो या वर्षातील विजय हजारे ट्रॉफीतील दुसरा सर्वाधिक विकेट्स गोलंदाज बनला आहे.

3. हिमालय संघाकडून खेळणारा शुभम अरोरा यानेही एक विक्रम केला आहे. त्याने विजय हजारेतील अंतिम सामन्यात 136 धावा कुटल्या होत्या. ही खेळी विजय हजारे ट्रॉफीमधील अंतिम सामन्यातील दुसरी सर्वोच्च खेळी आहे. शुभम हा हिमालयाचा चौथा खेळाडू आहे, ज्याने वैयक्तिक सर्वाधिक धावा केल्या आहेत.

4. दिनेश कार्तिक हा तमिळनाडूचा एक दिग्गज फलंदाज आहे. त्यानेही एक विक्रमी नोंद केली आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या 2 अंतिम सामन्यामध्ये शतके ठोकणारा तो पहिला खेळाडू आहे. त्याने यंदाच्या अंतिम सामन्यात हिमाचल विरूद्ध 116 धावा केल्या होत्या. यापूर्वी त्याने 2016-17 हंगामातील अंतिम सामन्यात बंगाल विरूद्ध 112 धावा केल्या होत्या. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. तर रॉबिन उथप्पा हा प्रथम क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याचे 3193 धावा आहेत.

5. ऋतुराज गायकवाडने जशी आयपीएल गाजवली तशीच आत्ता विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपली चमक दाखवली आहे. त्यानेही एक विक्रम केला आहे. त्याने या हंगामात चार शतके झळकावली आहेत, जी विजय हजारे ट्रॉफीच्या एका हंगामातील सर्वाधिक शतके आहेत. त्याने सलग तीन शतके ठोकली. या स्पर्धेत अजुनपर्यंत फक्त दोनच खेळाडूंनी सलग तीन शतके केली आहेत. एक म्हणजे नमन ओझा (2009-10) दुसरा म्हणजे देवदत्त पडिक्कल (2020-21).

6. मध्य प्रदेश संघाचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर याने चंदीगड विरूद्ध 151 धावांचा डोंगर उभा केला. आणि महत्वाचं म्हणजे विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच असे झाले आहे की, सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करून 150 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना 150 हून अधिक धावा करणारा व्यंकटेश जगातील सातवा फलंदाज ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विषय आहे का? फक्त भारत नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये ‘ही’ किमया साधणारा विराट बनला एकमेव कर्णधार

लेकीचा पायगुण! वामिकाच्या उपस्थितीत भारताचा द. आफ्रिकेत ऐतिहासिक विजय, मग विराटने दिलेली रिऍक्शन पाहाच

भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या हरनुरला मिळालाय क्रिकेटचा वारसा; अजोबा, वडील, काका देखील क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---